शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदाचे ग्रहण

By admin | Updated: May 23, 2016 00:58 IST

ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर आजतागत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पदे पूर्णपणे भरण्यात आली नाही.

रुग्णांचे हाल: कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलावरोरा : ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाल्यानंतर आजतागत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची पदे पूर्णपणे भरण्यात आली नाही. त्यामुळे आजही वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहेस तर नागरिकांनाही वैद्यकीय सेवा घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयाला वरोरा शहर, माढेळी, नागरी, कोसरसार, सावरी हे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वरोरा, माजरी, व शेगाव पोलीस ठाणे जोडण्यात आले आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या सत्रात तपासणीसाठी बाह्यरुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. वरोरा शहरालगत राज्य मार्ग, लोहमार्ग असल्याने अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच पोलीस प्रशासनाने आणलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन, आरोपीची वैद्यकीय तपासणी शेगाव, माजरी व वरोरा पोलीस करीत असतात. उपजिल्हा रुग्णालयातील अनेक उपकरणे तंत्रज्ञाअभावी बंद असल्याचे समजते. उपजिल्हा रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी, दोन लिपीक व दोन चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असल्याने त्यांच्यावरील कामाचा ताण वाढल्याने कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याचा विपरित परिणाम रुग्णांवर होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)रेफर टू सुरूचवैद्यकीय अधिकारी व तंत्रज्ञानाची रिक्तपदे तर काही उपकरणे बंद असल्याने रुग्णांना आवश्यक सेवा उपजिल्हा रुग्णालयात मिळत नाही. त्यामुळे अपघात झाल्यानंतर आलेल्या जखमीवर मलमपट्टी केली की त्याला रेफर करण्याचा प्रघात मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आजही तो कायम असल्याचे दिसून येत आहे. वरोरा रुग्णालयाचे दोन अधिकारी प्रतिनियुक्तीवरमागील कित्येक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पूर्ण पदे कधी भरण्यात आली नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा दिसत असताना उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठवून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्तपदाचे ग्रहण चालू ठेवले आहे.ओपीडी सकाळी १० वाजताउपजिल्हा रुग्णालयात दररोज ३०० च्या आसपास बाह्यरुग्ण येतात. बाह्यरुग्ण तपासणी बहुतांश सकाळी १० वाजता नंतरच सुरू होत असल्याचे समजते. सकाळी ८ऐ वाजता बाहेरगावावरुन रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णाना ताटकळत रहावे लागत असल्याचे दिसून येत आहे.