शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
3
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
4
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
5
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
6
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
7
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
8
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
9
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
10
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
11
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
12
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
13
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
14
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
15
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
16
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
17
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
18
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
19
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
20
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांच्या तालुक्याला विकासाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST

उदय गडकरी सावली : १५ ऑगस्टला सावली तालुका तिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मात्र आजही हा तालुका विकासाच्या दृष्टीने ...

उदय गडकरी

सावली : १५ ऑगस्टला सावली तालुका तिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मात्र आजही हा तालुका विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच आहे. विकासाचे ग्रहण कधी सुटणार, हा प्रश्न तालुकावासीयांना पडला आहे.

२० वर्षांच्या अथक संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९९२ ला तालुक्याची निर्मिती झाली. स्व. वामनराव गड्डमवार यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री स्व. सुधाकर नाईक यांनी तालुका निर्मितीची घोषणा केली. त्यासाठी पत्रव्यवहार आणि तालुका निर्मितीसाठी युवकांना संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक स्व. नी. ज. गडकरी यांनी पार पाडली. त्यांच्याच २० वर्षांच्या अथक संघर्षाचे फलित म्हणून सावली तालुका उदयास आला. तालुका झाला, पण विकासाचे काय? हा अनुत्तरितच असणारा प्रश्न. तालुका निर्मितीपासून सुमारे २० वर्षेपर्यंत या तालुक्याला दोन आमदार व दोन खासदार लाभले. परंतु त्यांना या तालुक्याचा सर्वांगीण विकास साधता आला नाही. ही सल सावलीकरांच्या मनात कायम आहे.

या तालुक्यासाठी मंजूर झालेली अनेक शासकीय कार्यालये सुरुवातीच्या २० वर्षांत इतरत्र पळविण्यात आली. क्रीडांगण, आठवडी बाजार, शासकीय इमारती, रोजगार निर्मिती, अशा अनेक बाबींची या तालुक्याला वानवा आहे. हे विकासाचे ग्रहण सोडविण्यासाठी कुणी पुढे धजावेल का?

बॉक्स

इंग्रज राजवटीत आसोलामेंढाची निर्मिती

२००९ ला परिसीमन आयोगाने सावली विधानसभा क्षेत्र गोठवून नवीन बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आणले. त्यातही सावलीकरांवर अन्याय करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी गाव म्हणून १९५२ मध्ये सावली गावाला विधानसभा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला. शिवाय इंग्रज राजवटीत १८९१ सालात जिल्ह्यातील सर्वांत मोठा असलेल्या आसोला मेंढा तलावाच्या निर्मितीसोबतच सावली येथे निरीक्षण गृह व कार्यालयाची स्थापना केली. या सर्व ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या जोरावर सावली तालुक्‍याचा कायापालट होणे अपेक्षित होते. २० वर्षांतील तालुका निर्मितीच्या संघर्षानंतरही ३० वर्षांपासून विकासासाठी संघर्षच करावा लागेल काय, हा प्रश्न आपसूकच उभा ठाकतो.