शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीला वाढीव कुटुंबांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:48 IST

राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते.

ठळक मुद्देअन्य योजनेतून बांधणार शौचालये : २२ हजार कुटुंबांना शौचालयाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यामध्ये तब्बल २२ हजार वाढीव कुटुंबीयांपर्यंत अद्याप शौचालयाची योजनाच पोहचली नाही. या कुटुंबीयांना आता स्वच्छ भारत मिशनऐवजी मनरेगा व अन्य योजनेतून शौचालय बांधून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमध्ये २०१२ ला पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये तीन लाख ३० हजार कुटुंबीयांची नोंदणी पूर्ण झाली. यात सर्वेक्षणानुसार त्यावेळी जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ५६६ कुटुंबीयांनी शौचालय बांधल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संबंधित यंत्रणेमार्फत गाव पातळीवर सर्वेक्षणाचा वेग वाढवून नव्याने माहिती हाती घेण्याचे काम सुरू केले. त्यातून एक लाख ४४ हजार ५२९ कुटुंबीयांकडे शौचालयाची योजना पोहचली नाही. ही माहिती पुढे आली.२०१४ मध्ये निर्मल स्वच्छता अभियान योजनेचे नामांतर करून स्वच्छता भारत मिशन या नावाने सरकारने वैयक्तिक शौचालय बांधण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टानुसार जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेकडून तीन लाख ३ हजार ९५ व्यक्तिक शौचालय बांधण्याचे लक्ष्य देण्यात आले. जिल्हा परिषदेने संबंधित यंत्रणेला गतिमान करून मार्च २०१८मध्ये हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. बेसलाईन नंतर मार्च २०१८ अखेर साध्य केलेले हे उद्दिष्ट लक्षवेधी असले तरी वाढीव २२ हजार कुटुंबीयांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ पोहोचविण्यासाठी जि.प. प्रशासनाची दमछाक झाली. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाले असून वाढीव कुटुंब शिल्लक आहे.यंत्रणेची उदासीनतापायाभूत सर्वेक्षणानंतर वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यास कमी पडली, असा आरोप काही ग्रामपंचायतींनी केला आहे. ही योजना गावखेड्यात पोहोचविण्यासाठी संबंधित कर्मचाºयांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाठपुरावा केला असता तर वाढीव कुटुंबांनादेखील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेचा लाभ घेता आला असता, असा दावाही त्यांनी केला आहे. वाढीव कुटुंबांना नव्या योजनेतून शौचालय बांधून देण्याचे नियोजन सरकारने केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला हा सरकारचा दावा कसा मान्य करायचा, असा प्रश्नही सरपंचांनी विचारला आहे.तीन पंचायत समित्यांची आघाडीवैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा तालुक्याने आघाडी घेतली. चिमूर (३०९१९), ब्रम्हपुरी (२९७६७), वरोरा (२७६९६) शौचालय बांधून उद्दिष्ट पूर्ण केले. चंद्रपूर पंचायत समितीने २५ हजार ८६१ शौचालय बांधली. ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसभेच्या जागरूकतेमुळे या योजनेला यश मिळाले.