शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक विद्यार्थ्याला देणार रूबेला इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:46 IST

आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे.

ठळक मुद्देमनपा : आढावा बैठकीत संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजारमुक्त पिढीसाठी शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गोवर रुबेला इंजेक्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. पालकांनी एक पाऊल पुढे येत शाळा व महानगरपालिका प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन चंद्रपूर मनपातर्फे गोवर रूबेला लसीकरण समितीने नागरिकांना केले आहे.या समितीमध्ये वैद्यकीय व्यावसायिक, शाळा प्रशासन, जागतिक आरोग्य संघटना, शिक्षण संस्था, समाज कल्याण विभाग, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब, इनरव्हिल क्लब, जेसीआय, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन आॅफ पेडियाट्रीक, नर्सिंग स्कूल, लेखा व्यवस्थापक, मदरशाचे प्राचार्य, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल पावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक पार पडली.या बैठकीमध्ये प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांमार्फत पालकांना लसिकरण मोहिमेची माहिती देणे आणि परवानगी घेण्याबाबत चर्चा झाली. शहरात १४ नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ० ते १५ वयोगटातील कोणताही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प समिती यावेळी जाहीर केला. निरोगी आयुष्यासाठी पालकांनीआपल्या पाल्याला इंजेक्शन दिलेच पाहिजे. यासाठी सर्व उपलब्ध साधनसामुग्रीचा मनपाकडून वापर केला जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या वापरातून लसीकरण करण्यासाठी विविध टप्पे तयार करण्यात आले. शहरातील प्रत्येक प्रभागाचे नियोजन कसे असावे, यावरही सदस्यांनी सूचना केल्या.मिजल्स-रुबेला काय आहे ?मिजल्स म्हणजे गोवर होय. रुबेला हा गोवरसारखाच सौम्य आजार आहे. परंतु, हा आजार गरोदर मातेला झाला तर बाळाला जन्मजात आजार होऊ शकतो. शरिरामध्ये जन्मजात विकार निर्माण होतात. मतिमंदता, आंधळेपणा, बहिरेपणा, हृदयाचे विकार तसेच गरोदर मातेचा गर्भपातही होऊ शकतो. जगभरात हा आजार वाढत असून त्यामध्ये भारताची टक्केवारी ३६ टक्के आहे. विकसीत देशांमधून हा आजार हद्दपार झाला आहे.