शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार ४० लाखांचा निधी

By admin | Updated: August 21, 2015 01:20 IST

गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला आता शासनाकडून ४० लाख रुपये देण्यात येणार आहेत.

संपूर्ण चेहरामोहरा बदलणार : गाव विकासाला चालना देणारी योजनाखडसंगी : गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला आता शासनाकडून ४० लाख रुपये देण्यात येणार आहेत. मात्र संबंधित ग्रामपंचायतीची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यांनी निवड केलेल्या गावाचा या निधीतून विविध विकास कामे होणार आहे. यातून गाव विकसित होईल.गावाच्या विकासासाठी हा निधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून देण्यात येणार आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनाकडून हा निधी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत ग्रामपंचायतीना गावामध्ये रोपवाटिका, पांदण रस्ते, गाव तलाव, गावातील अंतर्गत रस्ते, वन क्षेत्रातील रस्ते, पाझर तलाव, विहिरीतील गाळ काढणे, शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर खोदणे, वृक्षारोपणासाठी खड्डे तयार करणे आदी कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.प्रत्येक गावात रोपवाटिका तयार करण्यासाठी दोन लाख रुपये निधी खर्च करता येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी चार लाख रुपये , रस्त्याच्या कामासाठी १० लाख रुपये पाझर तलााव, तलाव व विहिरीतील गाळ उपसण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी, राजीव गांधी भवनासाठी १० लाख रुपयांपर्यंत निधी दिला जाणार आहे. अशा प्रकारे शासनाकडून देण्यात येणारा निधी विकास कामावर ग्रामपंचायतीना खर्च करता येणार आहे.या योजनेच्या कामांना गती मिळावी म्हणून जास्तीत जास्त कामे गावपातळीवर व्हावीत, यासाठी अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून तालुका स्तरावर गटविकास अधिकारी व तहसीलदारांना या बाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. विविध योजना पूर्णत्वाला गेल्यानंतर त्या गावाचा विकास दृष्टीपथास येत असल्याचे मत अनेकांनी यापूर्वीही व्यक्त केले आहे. अशा योजनाच्या अंंमलबजावणीवरच बरेच काही अवलंबून असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्याामुळे या साऱ्या योजनाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.निधीचा वापर करुन करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा ग्रामविकास विभागाने तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंंचायतीला सक्तीचे करण्यात येणार आहे. त्याचे अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासनाने जे निकष ठरविले आहेत, त्या निकषाला धरुनच त्या- त्या गावातील ग्रामपंचायतीचे दायीत्व राहणार आहे. तेव्हा योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे. (वार्ताहर)