शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची अंमलबजावणी गतिशील करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 23:19 IST

केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : विविध योजनांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला गॅस वाटप योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शुध्द पाणी पुरवठयाची अमृत योजना, महानगरातील पाणी पुरवठयासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला. चंद्रपुरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा अधिक सक्रीय व योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.या बैठकीला महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या दिवसभरांच्या बैठकांमध्ये त्यांनी सर्वप्रथम उज्ज्वला गॅस योजनेचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या गतीने वाढावी, यासाठी असणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. तर विविध गॅस कंपन्या आणि त्यांच्यावर नियंत्रण असणाºया जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांना आवश्यक सूचना केल्या. सामाजिक, आर्थिक सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यामध्ये एक लाख ७४ हजार पात्र कुटुंब आहेत. मात्र सध्या ५७ हजार कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी अंतोदयमध्ये येणारे कुटुंब, वनमजूर, अनुसूचित जाती, जमाती समुदायातील सर्व कुटुंब लाभार्थी ठरु शकतात. त्यामुळे या योजनेचा लाभ मोठया प्रमाणात जनतेपर्यंत पोहचावा, असे आवाहन यावेळी ना. अहीर यांनी केले. चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत २३१.७७ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी आली आहे. इरई धरणातून होणाºया या पाणी पुरवठा योजनेबाबतचा सद्यस्थिती आढावा ना. अहीर यांनी घेतला. पाणी पुरवठयाबाबत योग्य प्रमाणात वितरण व्यवस्था हाताळण्याची सूचना त्यांनी केली.