शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोयत्याने हल्ला

By admin | Updated: October 25, 2015 00:50 IST

दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या वैमनस्यातून दोन गटांत वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान सशस्त्र हल्ला करण्यात झाले.

दोन गंभीर : ११ जणांना अटक, आठ आरोपी फरारचंद्रपूर: दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान जुन्या वैमनस्यातून दोन गटांत वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान सशस्त्र हल्ला करण्यात झाले. यात दोनजण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास येथील जिल्हा परिषदेसमोर घडली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच, रामनगर पोलीस ठाण्यातील ताफ्यासह दंगा नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत रामनगर पोलीस ठाण्यात नागरिकांचा जमाव ठाण मांडून होता. दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून आठजण फरार आहेत. स्थानिक बंगाली कॅम्प परिसरातील रहिवासी अजय सरकार व प्रकाश अधिकारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी बंगाली कॅम्पमधील श्री श्री दुर्गाकाली माता मंदिर ट्रस्टद्वारा स्थापित दुर्गामातेचे विसर्जन करण्यात आले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बंगाली कॅम्प परिसरात वाहन चालविण्याच्या कारणावरून अजय सरकार व प्रकाश अधिकारी या दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर प्रकाश अधिकारी याने अजय सरकारवर हल्ला करण्याची योजना आखली. रात्री ९ वाजताच्या सुमारास दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक जिल्हा परिषदेसमोेर पोहचली. त्यावेळी प्रकाश अधिकारी काही युवकांना सोबत घेऊन तेथे पोहचला व त्याने अजय सरकारशी पुन्हा भांडण सुरू केले. हा वाद इतका पेटला की प्रकाश अधिकारी याच्या सोबत असलेल्या युवकांनी तलवार, सत्तूर, लाठ्यांनी अजय सरकारवर हल्ला चढविला. या हल्ल्यात अजय सरकारच्या गळ्यावर तर संजय सरकारच्या पोटावर गंभीर दुखापत झाली. या दोन्ही भावंडांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झालेत. सोबतच दंगा नियंत्रक पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी १९ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेनंतर ठाणेदार संपत चव्हाण, डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बारसे यांनी रात्रभर शोधमोहीम राबवून प्रकाश अधिकारी, राजेश अधिकारी, अमित अधिकारी, प्रविण अधिकारी, चंदन अधिकारी, मनोज अधिकारी, शशिकांत अधिकारी, सुजीत रॉय, पिंकू रॉय, अवजीत रॉय, रामराज बंसी, वलय चक्रवर्ती, मदन मोहन शाह, तारक दत्ता, तपन मिस्त्री, व्यंकेश दत्ता, समीरन रॉय यांना अटक केली. फरार असलेल्या आठ आरोपींचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)