शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

कोरोना काळात १०८ च्या रुग्णवाहिकेने दिले ४० हजार रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

चंद्रपूर : कोरोना महामारीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कोरोनासह विविध अपघात व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या सुमारे ३९ हजार ९२६ ...

चंद्रपूर : कोरोना महामारीत १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कोरोनासह विविध अपघात व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या सुमारे ३९ हजार ९२६ रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचवून जीवदान दिले आहे. त्यामुळे ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.

ग्रामीण भागात आजही दळणवळाच्या सोई उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना त्वरीत जिल्हा रुग्णालयात किंवा शहरातील रुग्णालयात नेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सन २०१४ पासून सुरु केली. जिल्ह्यात सुर्व सोईसुविधायुक्त २३ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. रुग्णवाहिकेमध्ये ऑपरेशन हेड डॉ. दीपककुमार उके यांच्या नेतृत्वात जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवा देत आहे. मार्च महिन्यांपासून विविध आजाराचे सुमारे ३९ हजार ९२६ रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविण्यात आले. रुग्णवाहिकेत उपलब्ध डॉक्टर प्राथमिक उपचार करीत असल्याने रुग्णालयात जातपर्यंत रुग्ण दगावण्याची शक्यता नाहीसी होत आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका नवसंजीवनी ठरत आहे

बॉक्स

कोरोनाच्या ३१ हजार रुग्णांना सुखरुप सोडले

कोरोनाबांधित रुग्ण, कोरोनामुक्त अशा सुमारे ३१ हजार ७२६ रुग्णांना मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत सुखरुप घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला घरुन कोव्हीड केंद्रात सोडणे, कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याला घरी सोडण्याचे कामे १०८ रुग्णवाहिकेने केले आहे.

बॉक्स

गंभीर कोरोना रुग्णाचे वाचविले प्राण

कोरोनाचा गंभीर रुग्ण नागपूरला हलविण्यासंदर्भात १ नोव्हेंबर रोजी १०८ ला फोन आला. रुग्ण वेंटिलेटर होता. मात्र शल्य चिकीत्सक निवृत्ती राठोड यांनी पीपीई कीट घालण्याचे प्रशिक्षण दिले होते. मात्र रुग्ण गंभीर असल्याने व चंद्रपूर ते नागपूर सुमारे १६० किमीचे अंतर कापणे जीकरीचे होते. मात्र रुग्णवाहिकेतील डॉ.अमीत दोडके वेळीवेळी रुग्णांची तपासणी करुन प्राथमिक उपचार करीत होते. तर चालक अरुण पाटील यांनी रुग्णांना वेळेत नागपूरला पोहचल्याने रुग्ण बरा झाला.

बॉक्स

डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पुरविणाऱ्या सुविधा

कोरोनाजन्य परिस्थिती असल्याने रुग्णवाहिकेतील डॉक्टर तसेच वाहनचालकांना एन ९५ मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझर, हॅण्डवॉश आदी सुविधा पुरविण्यात येत आहे.

रुग्णवाहिकेत रुग्णांसाठी ऑक्सिजन यासह अत्यावश्यक सेवा व तज्ज्ञ डॅाक्टर सेवा देत असतात.

कोट

कोरोना तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तपासणी केंद्रावर सोडले. तसेच बाधित रुग्णांना कोव्हिड सेंटरपर्यंत सोडणे तसेच कोरोनामूक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्याचे काम १०८ च्या रुग्णवाहिकेने केले आहे. यासोबतच ईतर प्रकारच्या रुग्णांनाही वेळेवर रुग्णालयात सोडले असून त्यांना जीवदान दिले आहे.

-राजकुमार गहलोह, जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर