शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उत्सवाच्या काळात दिसेना पोलीस मित्र!

By admin | Updated: September 1, 2014 23:28 IST

सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवाच्या काळात पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना समोर आली. यानुसार मागील वर्षी शहरात मोठ्या संख्येने जनजागृती करून

चंद्रपूर : सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवाच्या काळात पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना समोर आली. यानुसार मागील वर्षी शहरात मोठ्या संख्येने जनजागृती करून शहरातील तरुणांना पोलीस मित्र म्हणून पोलीस प्रशासनाने सहभागी करून घेतले. त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात आले. पोलीस मित्रांनी पोलिसांना सहकार्यही केले. यावर्षी गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असतानाही पोलीस मित्र दिसेनासे झाले आहे. त्यांचा सहभागही मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाला आहे.इतर दिवसांच्या तुलनेमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवामध्ये पोलिसांवर कामाचा ताण येतो. अशावेळी शांतता आणि सुव्यवस्था राखताना पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडते. यातुन पोलिसांची काही प्रमाणात का होईना सुटका व्हावी, त्यांच्यावरील ताण कमी व्हावा सोबतच नागरिकांच्या सहकार्यातून शांतता, सुव्यवस्था ठेवण्यास मदत व्हावी, पोलिसांच्या कामाची पद्धत तरुणांना समजावी आणि गुन्हेगारीवर आळा बसावा या हेतून पोलीस मित्र संकल्पना समोर आली. मागील वर्षी जिल्हा पोलीस प्रशासन, चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे डॉ. गोपाल मुंधडा यांच्या माध्यमातून ही संकल्पना साकार करण्यात आली. यासाठी मोठा गाजावाजाही करण्यात आला. पोलिसांच्या आवाहनानुसार शहरातील अनेक तरुणांनी पोलीस मित्र म्हणून अर्ज सादर केले. त्यानंतर तरुणांची निवड करून त्यांना ‘पोलीस मित्र’ म्हणून ओळखपत्र, टी शर्ट, कॅप सुद्धा देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देवून पोलिसांच्या कामाची पद्धत, सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना सांभाळण्याचे कौशल्य आदीचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा उपयोग मागील वर्षी झालेल्या गणेशोत्सव तसेच इतर कार्यक्रमात चांगल्या पद्धतीने झाला. गणेश विसर्जनाप्रसंगी पोलीस मित्रांची कामगिरी वाखान्याजोगी होती. या कार्याची जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दखल घेत त्यांचे कौतुक केले. हे सर्व केले असतानाही यावर्षी मात्र पोलीस मित्रांचा सहभाग कमी आहे. मागील वर्षी तीनशेच्या जवळपास असलेल्या पोलीस मित्र यावर्षी नेमके किती आहे हे सुद्धा कळू शकले नाही. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र पोलीस मित्रांना अद्यापही पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात आले नसून त्यांची मदतही मागितली नाही. (नगर प्रतिनिधी)