चंद्रपूर : नामदार सुधीर मुनगंटीवार, यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यास महाराष्ट्रात १ ते ७ जुलै रोजी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कम्पोष्ट डेपो येथे रविवारला दुपारी ३ वाजता नामदार सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, शहराचे प्रथम नागरिक महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद चंद्रपूरचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आहे.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ४ कोटी वृक्षारोपणाचे औचित्य साधून महापौर अंजली घोटेकर यांनी डंपींग ग्राऊंडला सुशोभित व सुंदर स्वच्छ करण्याकरिता त्या ठिकाणी ५ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी डंपिंग यॉर्डच्या सजावटीबद्दल महापौर अंजली घोटेकर यांचे कौतुक केले. सामान्यता: सर्वसामान्य व्यक्तीचा डंपींग ग्राऊंडकडे पाहायचा दृष्टीकोण फक्त कचरा टाकणे एवढाच असतो पण महानगरपालिकेने अतिशय अभिनव उपक्रम राबवून डंपींग यॉर्डचे सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेऊन ५ हजार वृक्ष लावण्याचा मानस केला आहे. पुढच्या वषी हे ठिकाण डंपींग ग्राऊंड म्हणून नाही, तर सुंदर सौंदर्यीकरण झालेला परिसर म्हणून याची ओळख झाली पाहिजे.असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, सभागृह नेते वसंत देशमूख, महिला बालकल्याण सभापती, अनुराधा हजारे, उपसभापती, जयश्री जुमडे, सभापती देवानंद वाढई, आशा आबोजवार, आदी उपस्थित होते.
वृक्ष दिनानिमित्त मनपातर्फे डम्पिंगयार्डची सजावट
By admin | Updated: July 5, 2017 01:12 IST