शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ब्रह्मपुरीत बनावट दारूचा पूर

By admin | Updated: August 12, 2015 00:48 IST

तालुक्यात व शहरात अवैध दारु सर्रास उपलब्ध होत आहे, हे काही नवीन नाही. परंतु, बनावट दारु जास्त प्रमाणात विकली ...

पोलिसांचे दुर्लक्ष : शहर व तालुक्यात मागेल तेथे मिळते दारूब्रह्मपुरी : तालुक्यात व शहरात अवैध दारु सर्रास उपलब्ध होत आहे, हे काही नवीन नाही. परंतु, बनावट दारु जास्त प्रमाणात विकली जात असल्याने अनेक मद्यपींना धक्का बसला आहे. त्यामुळे दारू निरखून पाहूनच पिण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात दोन वर्षांपूर्वी दारुबंदी विभागाने दारु विक्री बंद नसतानाही बनावट दारु तयार करून विक्री करीत असल्याचा सुगावा लागल्याने धाड टाकली होती. त्या दारुविक्रेत्याला अटक करुन कारागृहात रवानगी केली. आता १ एप्रिल पासून जिल्ह्यात दारुबंदी झाल्याने पून्हा ही टोळी सक्रीय झाली असून बनावटी दारुचा कारखाना सुरू केल्यानी चर्चा शहरात रंगत आहे. त्यामुळे या दारूविक्रीवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.शैक्षणिकदृष्ट्या प्रगत ब्रह्मपुरी नगरीत बनावट दारुचा कारखाना अस्तित्वात असेल तर शहराच्या व एकूण भवितव्याच्या बाबीवर परिणाम पडण्याची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच पोलीस प्रशासनाने खबरदारी घेण्याची वेळ असून मूंग गिळून बसलेल्या भूमिकेने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बेटाळा या गावात संपूर्ण महिलांनी जो गावात संपूर्णत: दारुबंदी करेल आम्ही त्यांनाच मते देऊ, अशी भूमिका घेऊन दारुबंदी विरोधात आवाज उठविला. परंतु निकाल लागल्यानंतर गावातील काही लोकांनी दारु आणून विक्री करायला सुरुवात केली असता महिलांनीच त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु, प्रशासनाने उशीरा कारवाई केली. ते पण संपूर्ण गावकरी पोलीस स्टेशन गाठून कारवाई करण्यास भाग पाडले तेव्हा दारुविक्रेत्यावर कारवाई करण्यात आली. आजही अनेक खेड्यात व शहरात दारु सर्रास दारू विकली जात आहे. आणि हे संबंधित विभागाला माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. शहरात व तालुक्यात मागेल तेथे दारु मिळत असल्याने दारुबंदी नाममात्र ठरली आहे. यापेक्षा दारुबंदी उठवून दारुविक्रीला सुरुवात करण्याची शासनाने परवानगीन देऊन टाकावी अशा अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया असून संबंधित विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित केल्या जात आहेत.शहराच्या हॉटेल, चायनिज सेंटर व अन्य टपऱ्यावर सर्रास दारुविक्री केली जात आहे. नागपूर, उमरेड व मध्यप्रदेश येथील उत्पादीत दारूची विक्री सुरू आहे. अशातच स्वनिर्मित दारुच्या उत्पादनाची पुन्हा भर पडल्याने मद्यपी जरी पित असले तरी पिण्यापूर्वी दारुच्या बॉटलचा लहान मुलाचा जसे लाळ करुन गोंजरले जाते, तसे गोंजरुन दारु पिली जात आहे.या सर्व बाबी स्थानिक पोलिसांना माहित आहेत. मात्र कोणीच उपाययोजना करीत नाही, ही बाब जिव्हारी लागणारी आहे. दारुचे किस्से व चित्र याविषयी अनेकांजवळ अनेक अनुभव व चर्चा आहेत. हे केव्हा बंद होणार हे मात्र कुणालाच ठाऊक नसल्याने अवैध व बनावटी दारुवाल्यांचा जयजयकार होत आहे. शहराची व कायदा सुव्यवस्थेची एैसीतैसी होण्यापूर्वी वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देऊन अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)