शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अऱ्हेरनवरगाव मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा

By admin | Updated: September 19, 2016 00:54 IST

तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो.

गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : रस्ता दुरुस्तीची मागणीब्रह्मपुरी : तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दोन विधानसभा क्षेत्रात विभागलेला अऱ्हेरनवरगाव ब्रह्मपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण ठिकाण आहे. या गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण, खरेदी, शासकीय कामे, भाजीपाला विक्रीसाठी अऱ्हेरनवरगाव या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहने या मार्गावरुन जात असतात. परंतु, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ेखड्डे पडलेले आहेत. परिणामी मार्गावर नेहमी पाणी साचले असते. यामुळे हा मार्ग जलमार्ग असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. या जलमार्गातून मुक्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.सदर रस्त्यावरील ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण झालेले आहे.मात्र उर्वरित रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रत्यावर लहान मोठ्या अशे अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्डयात नेहमी पाणी साचले असते. परिणामी या मार्गावर अनेकांचे अपघात घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचेसुद्धा सिमेंटीकरण होणे करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.यासंबधी जनप्रतीनिधीनासुद्धा कल्पना देण्यात आली. मात्र तेसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.जर रस्त्याची दुरुस्ती अथवा सिमेंटीकरण झाले नाही, तर गावकऱ्याकडून आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकातून अऱ्हेरनवरगाववासीयांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी )