चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने आर्थिक नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दारुसमर्थकांसह दारुविक्रेत्यांनी आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. नितेशच्या मृतदेहासह हे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या समयसुचकतेमुळे परिस्थिती निवळली.येथील सिस्टर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला नितेश आमटे याचा दुर्गापूर परिसरातील एका बारजवळ पानठेला आहे. पानठेल्याच्या बळावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र एप्रिलपासून जिल्ह्यात दारुबंदीहोणार असल्याने तो अस्वस्थ होता. या नैराश्यापोटीच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप दारूविक्रेत्यांनी केला आहे. बुधवारी नितेशने घरी गळफास लावून आत्त्महत्या केली. या घटनेची माहिती जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. निलेशच्या आत्महत्येमागे केवळ दारुबंदी हेच कारण आहे, असे समजून दारुविक्रेते, समर्थक तसेच कामगार नेत्या अॅड. हर्षलकुमार चिपळूनकर यांनी शासनाने दारुदुकानात काम करणाऱ्यांचे पुनर्वसन करावे, मृतकाला आर्थिक मदत द्यावी, दारुबंदी निर्णयाबाबत पुनर्विचार करावा आदी मागण्याकरित मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात अडवून ठेवला. त्यानंतर मोठ्या संख्येने दारु दुकानदार, समर्थक जमा झाले. (नगर प्रतिनिधी)आधी पुनर्वसन, नंतर करा दारुबंदीदरम्यान या घटनेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, आधी कामगारांचे पुनर्वसन करा त्यानंतर दारूबंदी करा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारुबंदी होणार आहे. यामुळे या व्यवसायावर आधारिक अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या दुकानामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्धेअधिक वय झाल्यानंतर त्यांना कुठेही काम मिळणार नाही, त्यामुळे शासनाने प्रथम कामगारांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली.
पानठेला चालकाच्या आत्महत्येमुळे दारुसमर्थक रस्त्यावर
By admin | Updated: March 26, 2015 00:50 IST