शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे दाणादाण

By admin | Updated: January 3, 2015 22:58 IST

जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले

चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची चांगलीच फजीती होत आहे.हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी जोमाने कामाला लागले. मात्र सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर दुबार पेरणी केली. मात्र पिकांची अपेक्षीत वाढ झाली नाही. पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. तर सिंचनक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने सिंचन करताना अनेक अडचणी येत आहे. खरीप हातातून गेल्यानंतर रब्बीकडे शेतकऱ्यांची आशा होती. मात्र पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने रब्बी पिकांचेही नियोजन कोलमडले. कृषी विभागाने रब्बीसाठी २ हजार ११० हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असताना केवळ ६९२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी करण्यात आली. मात्र तीही जेमतेमच आहे. त्यातच आता अकाली पावसाने शेतकऱ्याना चांगलेच झोडपून काढले आहे. सध्या शेतामध्ये कापूस, धान, तूर, मिरची, हरभरा, उळीद, मुंग, भाजीपाला आहे. यामध्ये कापूस आणि कापणी केलेल्या धानाचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी तूरीलाही फटका बसला आहे. मिरची तोड व्हायची असल्याने या पिकाला फटका बसला नसला तरी उत्पादनात घट येणार आहे.काही कोरडवाहू मातीच्या जमिनीमध्ये कापूस निघत आहे. मात्र अवकाळी आलेल्या पावसामुळे कापसाची प्रत घसरली आहे. कापसाला काळे डाग पडले आहे. तर काही ठिकाणी झाडावरून कापूस लोंबकळत असल्याने तो वेचणार तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच भाव नसल्याने घडाईपेक्षा मळाई जास्त अशी अवस्था कापूस उत्पादकांची झाली आहे.विशेष म्हणजे, सिंचन असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आहे. या कापसाचे पूर्णत: नुकसान झाले. तर दुसरीकडे मातीची जमिन आणि सध्या बोंड असलेल्या झाडांना पाणी मिळाल्यामुळे कापसाच्या वजनात वाढ होईल, असेही बोलल्या जात आहे.मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले आहे. सध्या काही शेतकऱ्यांचे धान निघाले आहे. तर काहींनी शेतामध्ये धान कापून ढिग लावून ठेवले आहे. या ढिगाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या शेतातील धान ओले झाले आहे. अत्यल्प पावसामुळे कोरडवाहू रब्बी पिकांच्या पेरणीत यावर्षी झपाट्याने घट झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनीच गहू, हरभऱ्याचे पेरणी केली. त्यामुळे पावसाचा या पिकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. (नगर प्रतिनिधी)