शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पोंभूर्णा तालुक्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येत

By admin | Updated: January 11, 2015 22:50 IST

पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे

पोंभूर्णा : पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. सर्व युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांनाच आशा असते. परंतु तसे घडत नाही.कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर मुलाखत दिली तर तुम्हाळा कळवू, असे संबंधित उमेदवाराला सांगण्यात येते. पुढे त्याला काहीच कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात अशी कितीतरी वर्षे निघून जातात. पण नोकरी मात्र मिळत नाही. तसेच पाहिजे तसा व्यवसायही करता येत नाही. त्यामुळे तरुणांच्या नशिबी नैराश्य आले आहे. आजुबाजूला नजर टाकली तर ज्यांचेजवळ पैसा आहे किंवा ज्यांची ओळख वरपर्यंत आहे, अशानाच सध्या नोकरीची संधी मिळत आहे.सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था पैशावरच चालतात. जे युवक परिश्रम घेऊन शिक्षण घेतात. ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. यातून तरुण पिढीचे मन नैराश्याने ग्रासले आहे. शेवटी परिस्थितीच त्यांची तशी बनली आहे.या युवा पिढीवर पुढे देशाचे भवितव्य अवलंबून आहे, पण ही युवापिढी नैराश्येच्या खोल गर्तेत ढकलल्या गेली तर देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिक्षणासाठी वारेमाप खर्च करावा लागतो तर दुसरीकडे मात्र शिक्षण झाल्यावरही चप्पल झिजवावे लागते. परिश्रम करूनही आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नसेल शिक्षण घेऊन काय उपयोग, असा प्रश्नही बेरोजगारांना सतावत आहे. (वार्ताहर)