शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भांडणामुळे बसवाहक पडल्या बेशुद्ध !

By admin | Updated: January 22, 2017 00:44 IST

एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.

चंद्रपुरातील घटना : शहर बससेवा बंद केल्याने हाणामारीची पाळीचंद्रपूर : एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यासोबतच शहरात बस थांबत नसल्याने बसवाहक आणि प्रवाशांमधील भांडणाचे प्रमाणही वाढले आहे. अशाच एका भांडणातून महिला वाहकाला दवाखान्यात भरती करावे लागले. हा प्रकार आज शनिवारी येथील बागला चौकात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडला. पुष्पा भानारकर असे सदर महिला वाहकाचे नाव आहे.यापूर्वी चंद्रपुरात शहर बससेवा सुरू होती. त्यामुळे अनेक नागरिक या बससेवेचा लाभ घेत शहरातील विविध ठिकाणी बसने ये-जा करीत होते. मात्र मागील महिन्यापासून एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करून त्याचेच रुपांतर ग्रामीण बससेवेत केले. मात्र ही बस शहरात ठराविक एक-दोन ठिकाणी थांबते. इतर ठिकाणी ही बस थांबत नसल्याने प्रवाशी व बसवाहकांमध्ये अनेकदा कडाक्याचे भांडण होत आहे. पुष्पा भानारकर या बसवाहक आज सकाळ पाळीत दुर्गापूर ते राजुरा बसफेरीसाठी (बस क्रमांक एमएच ३४ एन ९४२७) निघाल्या. ही बस सकाळी ११ वाजताच्या सुमारास लालपेठ पोलीस चौकीजवळ येताच बसमधील दोन महिला प्रवाशांसोबत बस थांबविण्यावरून वाहक भानारकर यांच्यासोबत वाद झाला. तिथून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत त्यांचा वाद सुरूच होता. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण आले. त्यानंतर अचानक वाहक भानारकर यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे सदर प्रवाशांना उतरवून बस बागला चौकात थांबविण्यात आली. भानारकर या बागला चौकीत गेल्या आणि तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडल्या. विशेष म्हणजे, हा प्रकार सुरू असताना बसचालक वेगळ्याच चिंतेत होते. त्यांची बस एकदा बंद झाली की ती पुन्हा सुरू होत नाही, एवढी भंगार होती. त्यामुळे ते बसला बंद करू शकत नव्हते. नागरिकांनीच त्या मार्गावरून जाणाऱ्या एक रुग्णवाहिकेला थांबवून वाहक पुष्पा भानारकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. (शहर प्रतिनिधी) दीड तासानंतर पोहोचले महामंडळाचे अधिकारीहा प्रकार घडला तेव्हा बसचालक घटनास्थळावर होते. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. वाहक बेशुद्ध झाल्यानंतर बसचालक तिकीट मशीन सांभाळू लागले. बसही बंद करू शकत नव्हते. अखेर नागरिकांनीच वाहक पुष्पा भानारकर यांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. तिथून एसटी महामंडळाच्या कार्यालयात फोन करून ही माहिती देण्यात आली. रुग्णालयापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हे कार्यालय आहे. मात्र एसटी महामंडळ कार्यालयातून केवळ एकच कर्मचारी तेदेखील तब्बल दीड तासानंतर रुग्णालयात पोहचला. यावरून महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांप्रति किती संवेदनशील आहे, हे दिसून येते. त्रास वाढलाशहर बससेवेचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केल्यामुळे वाहकांचा त्रास वाढला आहे. प्रवाशांसोबत दररोज भांडणे होत आहे. वाहक पुष्पा भानारकर यादेखील यामुळे त्रस्त होत्या, असे त्यांनीच सांगितले. त्यामुळे त्यांनी ही ड्युटी बदलवून देखील मागितली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.