शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

शक्तिशाली विद्युत टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात

By admin | Updated: May 29, 2014 23:55 IST

नजीकच्या नांदा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या दुध डेअरी लोकवस्तीत सध्या विद्युत टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. दोन लाख २0 हजार व्हॅट विद्युत क्षमतेच्या या टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात

लखमापूर : नजीकच्या नांदा ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या दुध डेअरी लोकवस्तीत सध्या विद्युत टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. दोन लाख २0 हजार व्हॅट विद्युत क्षमतेच्या या टॉवरमुळे ग्रामस्थांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोकवस्तीत टॉवर उभारण्यास गावकर्‍यांचा विरोध आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्यावतीने हे टॉवर उभारले जात असून गडचांदूर सबस्टेशनपर्यंत अतिरिक्त विद्युत क्षमतेसाठी टॉवर उभारले जात आहे. यांपैकी बरेच टॉवर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतात उभारले गेले असून त्यांना त्याची भरपाई देण्यात आली आहे. यांपैकी या एक  टॉवर १५ ते १६ घरांची वस्ती असलेल्या दुध टेअरी कॉलनीतील किशोर सिंग राठोड व सपन बाला यांच्या घराच्या अंगणात उभारले जात आहे. टॉवरसाठी  सदर जागेवर खड्डेही खोदण्यात आले. याआधी या दोन्ही जागा मालकांनी टॉवर उभारण्यास हरकत नसल्याचे लेखी देऊन जागा कंपनीला दिल्याचे  समजते. या जागेची किंमत जागा मालकाला  देण्यात आली आहे. मात्र या लोकवस्तीत राहणार्‍या इतर कुटुंबियांना याचा मोठा फटका बसणार असल्याने ग्रामस्थांनी यासाठी तीव्र विरोध दर्शविला आहे. सदर लोकवस्तीत गेल्या १0 ते १५ वर्षांपासून अनेक कुटुंबीय वास्तव्याला आहेत. यापूर्वी सन १९६६ मध्ये या ठिकाणाहून पॉवर लाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे काहीजणांना मजल्याचे घर बांधता आले नाही. अशातच  पुन्हा या शक्तीशाली टॉवरचे संकट पुढे उभे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मोठय़ा क्षमतेच्या टॉवरमुळे बेबी सिंड्रोम, अंगावरील केस उभे होणे, डोकेदुखी, चिडचिडेपणा, आदी दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सततच्या विद्युत प्रवाहामुळे पक्षांच्या प्रजनन क्षमतेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. टॉवरच्या प्रभावामुळे मोबाईल कव्हरेज नसणे, दूरदर्शन न दिसणे, तसेच जनावरांवरही याचा परिणाम होऊ शकतो. हे लक्षात आल्याने नागरिकांनी विरोध केला असून टॉवर बाधित लोकवस्तीतील घरांची विक्री करताना किंवा दुमजली घरे बांधताना मोठा अडसर निर्माण होण्याची चिन्हे आहे. काल टॉवरचे बांधकाम करण्यासाठी खड्डे खोदण्यात आले. त्यामुळे येथील नागरिक प्रकाश बोरकर,उपसरपंच बंडू वरारकर, भास्कर लोबने, हरेंद्रसिंग ठाकूर, टी.के. शहा, राम नरेश यादव यांनी विरोध केल्याने सध्या टॉवरचे काम ठप्प झाले आहे. (वार्ताहर)