शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहतोय दारूचा महापूर

By admin | Updated: May 20, 2016 01:05 IST

महाराष्ट्र शासनाने जनतेचे हित लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी लागून केली. या निर्णयाला तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उदासीन धोरण : पोलिसांचा डीलरशी साठेलोटे असल्याचा संशय आवाळपूर : महाराष्ट्र शासनाने जनतेचे हित लक्षात घेता चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारुबंदी लागून केली. या निर्णयाला तेव्हा जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता मात्र याच जिल्ह्यात दारुचा महापूर पहावयास मिळतो आहे. महाराष्ट्र शासनाने दारुबंदीचा चांगला निर्णय घेतला असला तरी कोरपना तालुक्यात गावागावात दारु मिळत आहे. प्रशासन आणि पोलीस विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक बेरोजगारांसाठी दारुविक्री हा उत्तम व्यवसाय बनला आहे.शासनाने गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार, दारुमुळे भरकटलेल्या तरुणांची संख्या कमी होणार, अशा वेगवेगळ्या हितकारी उद्देशाने दारुबंदी केली. मात्र दारुविक्री व्यवसायात लवकर श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाई भरकटत चालली असून दारुविक्रीस पुढाकार घेत आहे. कोरपना तालुक्याला यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्याची सीमा लागून आहेत. या सीमेवरुन अवैध दारु वाहतुक फोफावली आहे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता सर्रासपणे दारु विक्रेते दारुची अवैध वाहतूक करताना दिसून येत आहे. एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन गावातील जनतेला जागृत करीत आहे. गावागावात जावून समिती गठीत करीत करण्याचे कार्य करीत आहे.पोलीस विभागाचे दारु विक्रेत्यासोबत साटेलोटे असल्याने आणि कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याने दारु विक्रेत्याची माहिती देण्यास अनेक नागरिक टाळत असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीस विभागाच्या गाफील, उदासीन धोरणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर असून रोष व्यक्त केल्या जात आहे.नुकत्याच आवाळपूर येथे घडलेला अ‍ॅसिड हल्ला हा पोलीस विभागाची उदासीनता दर्शविणारा ठरला आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून धोका आहे, असे कळविल्यावरही त्या व्यक्तीवर पोलीस विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. परिणामी अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या घटना समोर येतात. (वार्ताहर)