शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी न घेताच केला नाल्याचा उपसा

By admin | Updated: August 21, 2015 01:22 IST

नांदा ग्रामपंंचायतीमध्ये आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काम पूर्ण होण्याआधीच इलेक्ट्रॉनिक पोलसाठी ठेकेदाराला दोन लाख रुपये दिल्याचा ठपका....

५७ हजार ९०० रुपयांचे बिल द्यायचे कुणी ? : जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीविरुद्ध तक्रारनांदाफाटा : नांदा ग्रामपंंचायतीमध्ये आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काम पूर्ण होण्याआधीच इलेक्ट्रॉनिक पोलसाठी ठेकेदाराला दोन लाख रुपये दिल्याचा ठपका नुकताच सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण ताजेच असताना आता जिल्हा परिषद सदस्या सरोज मुनोत यांचे पती अभय मुनोत यांनी ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच वार्ड क्र. ६ मधील नाल्याचा नजीकच्या ठेकेदाराला हाताशी धरुन जेसीबीमार्फत उपसा केला आहे. यात ग्रामपंचायतपुढे सदर कामाचे ५७ हजार ९०० रुपयांचे बिल मंजुरीसाठी सादर केले आहे. दरम्यान, यासाठी आपणावर खोटे आरोप लावून प्रशासकीय कामास अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार सरपंच पूजा मडावी यांनी ठाणेदार गडचांदूर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणामुळेच नुकतीच तंंटामुक्त समिती अध्यक्षांची निवडणूकही तणावाच्या वातावरणात पार पडली असून ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी योग्य मोजणी न करताच तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडल्याची ओरड गावकऱ्यांनी केली आहे. यातच पुन्हा वादाला तोंड फुटून सरपंच पूजा मडावी यांनी हारुन सिद्दीकी आणि अभय मूनोतविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यांना धक्काबुक्की झाल्याचेही सांगण्यात येते.नांदा ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. नुकताच या गावाला सात लाख रुपयाचा तंटामुक्ती पुरस्कार मिळाला. मात्र स्थानिक राजकीय मंडळींच्या वैयक्तिक स्वार्थामुळे विकास खुंटला आहे. (वार्ताहर)बिबी ग्रामपंचायतीपुढेही केले २० हजार रुपयांचे बिल सादरनांदा व बिबी ग्रामपंचायत हद्दीत येणारा नांदाफाटा वार्ड क्र. ६ मधील नाल्याचा उपसा करण्यात आला. यात नांदासह बिबी ग्रामपंंचायतीकडून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. मात्र बिबी ग्रामपंंचायतीपुढेही अभय मुनोत यांनी काही स्थानिक नागरिकांचे अर्ज घेऊन २० हजार रुपयांच्या बिलास मंजुरी देण्याची मागणी केली आहे. सदर प्रस्ताव १५ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या आमसभेत ठेवण्यात आला. ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केल्याचे समजते.