शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चहाला पैसे न दिल्याने रुग्णाला रूग्णवाहिकेतून उतरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:51 IST

चहापानाला पैसे न दिल्याने चक्क रुग्णालाच भर रस्त्यात रुग्णवाहिकेतून उतरवून दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी घडल्याची बाब येथे उघडकीस आली. सदर १०८ रुग्णवाहिका सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयाची होती. तालुक्यातील ताडाळा येथील रमेश कोंडु कोडापे (५५) यांच्या शरीरावर सुज आल्याने ते मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून चंद्र्रपूरला जाण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्देसिंदेवाही येथील डॉक्टर आणि चालकावर आरोप

भोजराज गोवर्धन।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चहापानाला पैसे न दिल्याने चक्क रुग्णालाच भर रस्त्यात रुग्णवाहिकेतून उतरवून दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी घडल्याची बाब येथे उघडकीस आली. सदर १०८ रुग्णवाहिका सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयाची होती.तालुक्यातील ताडाळा येथील रमेश कोंडु कोडापे (५५) यांच्या शरीरावर सुज आल्याने ते मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून चंद्र्रपूरला जाण्याचा सल्ला दिला. आर्थिकस्थिती हलाखीची. खासगी वाहनाचा खर्च आवाक्याबाहेर होता. ही व्यथा त्यांनी सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना सांगितली. झिरे यांनी १०८ क्रमांकाच्या वाहनाने चंद्रपूरला जाण्याचा सल्ला दिला. दुपारी १२ वाजता १०८ क्रमांकावर भ्रमणध्वनी करून रूग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. मूल, पोंभुर्णा, सिंदेवाही येथील रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सदर रूग्ण मूल उपजिल्हा रूग्णालयात रुग्णवाहिकेची वाट पहात होता. सायंकाळी ५ वाजता सिंदेवाही येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका (क्र. एमएच १४ सीएल ११५८) मूल येथे आली.मूलला रुग्णवाहिका परत आणलीयावेळी रूग्णालयातील एका रूग्णासह रमेश कोंडु कोडापे या रूग्णालाही या रूग्णवाहिकेत बसविले. कोडापे यांच्यासोबत त्यांची पत्नी व शेजारी गणेश टेकाम हे होते. मूलपासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर पोहचल्यानंतर रूग्णवाहीकेतील कर्मचाºयाने चहापानासाठी पैसे मागितले. पैसे नसल्याने रुग्णाने देण्यास नकार दिला. एवढ्यावरून चालकाने रूग्णवाहीका परत मूलला आणून भोयर यांच्या कॅन्टीनजवळ रुग्णाला उतरवून दिले.सदर बाब रूग्णासोबत गेलेल्या गणेष टेकाम यांनी झिरे यांना दिली. ही माहिती रुग्णासोबत असलेले गणेश टेकाम यांनी उमेशसिंह झिरे यांना सांगितली.झिरे यांनी परत १०८ वर संपर्क साधून संबंधित अधिकाºयांना सांगितली असता अर्ध्या तासात दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली. अखेर सावली ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहीकेने रमेश कोडापे या रुग्णाला चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहचून दिले. या घटनेने रुग्णवाहीका सेवेवरच प्रश्न लागले आहेत.मोलमजुरीचे पैसे मिळाल्याने झाले भरतीमागील १० दिवसांपासून रमेश कोडापे हे आजारी होते. त्यांच्याजवळ पैसा नसल्याने ते रूग्णालयात जावून उपचार घेऊ शकत नव्हते. पत्नीला मोलमजुरीचे पैसे मिळाल्याने तिने त्यांना मूल उपजिल्हा रूग्णालयात आणले. चंद्रपूर जाण्याची पाळी त्यांच्यावर आली, तेव्हा शासकीय रूग्णवाहीकेत चहापानाच्या पैशासाठी उतरवून देण्यात आल्याने माणुसकी हरवल्याचा प्रत्यय त्यांना आल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. यावरून रुग्णवाहिकेच्या सेवेवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.रूग्णच यायला तयार नव्हताएका रूग्णाला चंद्रपूर नेण्यासाठी रूग्णवाहीका मूल येथील उपजिल्हा रूग्णालयातील गेली होती. रमेश कोडापे उपाचारार्थ चंद्रपूर येण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्याला रूग्णवाहीकेत बसविण्यात आले, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्याकडील वैद्यकीय कागदपत्रे बघितले असता त्यांच्याकडे रेफर स्लिप नव्हती. ही माहिती त्यांना दिली. यामुळे ते चंद्रपूर येण्यात तयार नव्हते. मूल येथे पोहचवून देण्याचा आग्रह केला. यामुळेच रूग्णवाहिका मूल येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या मार्गावर सदर रूग्णाला सोडण्यात आले,-डॉ. नितीन भैसारे, वैद्यकीय अधिकारी, १०८ रुग्णवाहिका.