शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:00 IST

रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी,

ठळक मुद्देरत्नापूर : दीड किलोमीटरचे काम अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़रत्नापूर-खांडला-सरांडी या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाले. सदर काम विभागून दोन कंत्राटदाराला देण्यात आले. त्यापैकी एका कंत्राटदाराने रत्नापूर ते पुरकेपार रस्ता फाटा तर वांगेनाला ते सरांडीपर्यंत काम पूर्ण केले. दुसºया कंत्राटदाराला हुमन प्रकल्पाच्या पाळीपासून ते वांगेनाला हा दीड किमीचा टप्पा देण्यात आला. कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकून उन्हाळ्यामध्येच कामाला सुरुवातही केली. मात्र गिट्टीचा दर्जा निकृष्ट होता़ त्यामुळे नागरिकांनी आक्षेप घेतल्याने वरिष्ठांनी बाधंकाम थांबविले. त्यानंतर थोडाबहुत डांबराचा वापर करून डागडुजी केली. मात्र, आजही प्रत्यक्ष डांबरीकरण करण्यात न आल्याने दीड किमीच्या रस्त्यावरील गिट्टी पुन्हा उखडली़ या रस्त्याने ये-जा करणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता खांडला-सरांडी आदिवासी बहुल लोकसंख्या असलेली गावे असून जंगलांनी वेढलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजही या रस्त्यावर शासनाची एसटी बससेवा पोहचली नाही़ इतरही प्रवासाची साधने गावात नाहीत़ त्यामुळे खांडला-सरांडी वासीयांना सायकल-दुचाकी किंवा पायदळ प्रवास करावा लागतो. गावाच्या सभोवताल आणि या रस्त्याच्या दुतर्फा मोठे जंगल असून जंगलामध्ये वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्त्र पशुंचा वावर असतो़ रत्नापूरवरुन खांडला सात किमी तर सरांडी हे गाव दहा किमी असल्याने शालेय विद्यार्थी व गावकºयांना या जंगलव्याप्त रस्त्यावरुनच जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. वरिष्ठ अधिकाºयांनी या रस्त्याची चौकशी करून डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे़