शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पिकांच्या नुकसानीमुळे ‘गजस्वारी’त आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:08 IST

गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला शिवारात ठाण मांडूण असलेल्या नरभक्षक वाघिनीमुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

ठळक मुद्देनरभक्षक वाघिणीचा शोध सुरूच : वनविभागासमोर मोठा पेच

वेदांत मेहरकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला शिवारात ठाण मांडूण असलेल्या नरभक्षक वाघिनीमुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे. या वाघिणीच्या शोधासाठी सोमवारला गजराजला पाचारण करण्यात आले. मात्र शेतशिवारातील पिकांची प्रचंड नुकसान होणार, या भितीपोटी गजस्वारीतून वाघिणीचा शोध या मोहिमेस आडकाठी निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपुर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घालून गावकरी व पाळीव जनावरांना ठार करणाºया नरभक्षक वाघिणीला तेथील वनविभागाने जेरबंद करून चपराळा अभयारण्यात सोडले होते. तेथून ती वाघिण वैनगंगा नदी ओलांडत गोंडपिपरी तालुका हद्दीत शिरकाव करून गेल्या दोन दिवसांपासून विठ्ठलवाडा परिसरातील नांदगाव (घडोली) व येनबोथला या शिवारात भ्रमण करित आहे. याबाबत ‘रेडिओ कॉलर’ तंत्रज्ञानामुळे वनविभागाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे वनविभागाने सर्च मोहिम चालवून ‘त्या’ नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला. मात्र शेतशिवारातील झुडपे व पराठी पिके यांची उंची अधिक असल्याने वनविभागाच्या कर्मचाºयांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.अखेर वनविभागामार्फत बोर अभयारण्यातून हत्तीणीला पाचारण करून वाघिणीची शोध मोहीम करण्याचे ठरवून सोमवारी गजराजाला वनविभाग विक्री आगारात आणण्यात आले. मात्र वाघिणीचे ठाण असलेल्या रेडिओ कॉलर यंत्राच्या माहितीच्या साहाय्याने मिळालेल्या लोकेशनपर्यंत पोहचण्यासाठी ‘गजस्वारी’ करताना शेतपिकांची प्रचंड प्रमाणात नासधूस होणार असून होणाºया संभाव्य नुकसानीची भरपाईबाबत अद्यापही वनविभागाच्या कर्मचाºयांना खात्री न झाल्याने व शेतकºयांचा पुढील काळात निर्माण होणारा संभाव्य संताप, याचा विचार करून सर्च मोहिमेतील कर्मचाºयांनी ‘गज स्वारीतून’ वाघिणीची सर्च मोहीम तूर्तास टाळली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळच्या सुमारास त्या वाघिणीने रानडुकराची शिकार केल्याची माहिती आहे.