शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गाव राहते रात्रभर जागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 20:54 IST

सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे.

ठळक मुद्देगावाजवळ चार ते पाच बिबट्यांचा वावरचारही पिंजऱ्यांना बिबट्याने दिली हुलकावणीसौर उर्जा पोलचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी हे गाव मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या प्रचंड दहशतीत आहे. गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत असून आतापर्यंत बिबट्याने घरात घुसून दोघांचा बळी घेतला आहे. वनविभागाची चमू गावात ठाण मांडून आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार पिंजरे लावण्यात आले आहे. मात्र बिबट पिंजऱ्यांना हुलकावणी देत आहे. गावाभोवताल ५० सौर उर्जेचे दिवे लावण्याचे काम सुरू असून आतापर्यंत ३५ खांब लावून झाले आहे.६ जूनच्या रात्री एका महिलेला बिबट्याने ठार केल्यानंतर वनविभागाने रात्री गस्तीत वाढ करून गावातील ५० युवकांनाही वनविभागाने गस्तीवर लावले आहे. गावाशेजारी वन विभागाने कॅमेरे लावले असून चार पिंजरे लावले आहेत. त्यातील दोन पिंजऱ्यावरून उडी मारून बिबट गेला. मात्र पिंजऱ्यात अडकला नाही. त्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.गावाशेजारी वनविभागाने सौर उर्जेवर चालणारे दिवे लावण्याचे कार्य सुरू केले आहेत. त्यामुळे गावाशेजारी प्रकाश राहणार व स्पष्ट बिबट दिसल्यास मदत होईल. नागरिकांना त्रास होणार नाही. सौर दिव्यांसाठी ३५ खांब लावले असून उर्वरित १५ खांब लावण्याचे काम सुरू आहे.रात्री ऐकू येते बिबट्यांची डरकाळीगडबोरी गावासभोवताल चार ते पाच बिबट फिरत आहे. यातील एक बिबट वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केला आहे. उर्वरित बिबट गावपरिसरातील किल्ल्यावरच आहे. गावातील लोकांना रात्री बिबट्याची डरकाळी ऐकू येते. कधीकधी तर ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शनही होत आहे. त्यामुळे संपूर्ण गाव बिबट्याच्या दहशतीत जगत आहे.गडबोरीमध्ये गस्त वाढवली असून गावातील ५० युवक गस्तीवर आहे व वनविभागाचे कर्मचारी रात्री गस्त घालत आहेत. गावासभोवताल सौरऊर्जाचे दिवे लावण्याचे काम सुरू आहे. रात्री दोन पिंजऱ्याला बिबट्याने हुलकावणी दिली. पण बिबट पिंजऱ्यात अडकला नाही. पिंजऱ्यात बिबटला अडकवण्याचे प्रयत्न सुरू आहे.- एस.वाय. बुल्लेक्षेत्र सहाय्यक नवरगावसिंदेवाही वनपरिक्षेत्र

 

टॅग्स :leopardबिबट्या