शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाठपुराव्याअभावी अग्निशमन वाहन खरेदी प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST

सावली : सर्वसामान्य जनतेचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणेला अजूनही अंतिम मंजुरी प्राप्त झालेली नाही. पाठपुराव्याअभावी अग्निशमन ...

सावली : सर्वसामान्य जनतेचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अग्निशमन यंत्रणेला अजूनही अंतिम मंजुरी प्राप्त झालेली नाही. पाठपुराव्याअभावी अग्निशमन वाहन खरेदीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

दिवसेंदिवस उन्हाचा तडाका जोर पकडत आहे. सावली तालुक्यात मागील काही दिवसांपासून आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता चंद्रपूर, बल्लारशा, मूल, पोंभूर्णा येथून अग्निशमन दलास पाचारण करावे लागते. ऐनवेळी अग्निशमन दल पोहोचत नसल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागले आहे. सावली शहर दाट वस्तीचे शहर असून, आगीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी सावली नगरपंचायतकडे पुरेशी अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरपंचायतमध्ये अग्निशमन यंत्रणेचे वाहन असावे, याकरिता वंचित बहुजन आघाडीने गत दीड वर्षांपूर्वी अग्निशमन दलाची मागणी केली होती. यासाठी विविध पातळीवर पाठपुरावा करण्यात आला.

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील महिन्यात डीपीडीसी या निधीतून अग्निशमन वाहन खरेदीकरिता निधी उपलब्ध करून दिला. मात्र अद्यापपर्यंत नगर पंचायतच्या पाठपुराव्याअभावी अग्निशमन वाहनाची खरेदी रखडलेलीच आहे.

बॉक्स

नगरपंचायत होऊन पाच वर्ष लोटली

या शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळून पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. परंतु स्थानिक पातळीवर आजही अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शहरात किंवा परिसरात आगीच्या घटना घडल्यास आग विझवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.

तालुक्यात १११ गावे असून, शहरात किंवा परिसरात आगीच्या घटना घडल्यास बाहेरगावाहून अग्निशमन दलास पाचारण करावे लागते. सदर वाहन पोहोचेपर्यंत उशीर होतो व आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करून सावली शहराकरिता अग्निशमन वाहन खरेदी करावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून करण्यात येत आहे.