शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक पाठबळाअभावी महिला बचतगटांची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:49 IST

चंद्रपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली़ परंतु, मनपा प्रशासनाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तुंना विक्रीची व्यवस्था नसल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे़

ठळक मुद्देहजारो महिलांमध्ये नाराजी : चंद्रपुरात स्वयंरोजगार उभारण्यात अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली़ परंतु, मनपा प्रशासनाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तुंना विक्रीची व्यवस्था नसल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे़शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील महिलांना बचत गटाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले होते. बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता मिळाल्यास सामाजिक प्रश्न कायमचे सुटू शकतात़ शिवाय लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये आपले न्यायहक्क प्राप्त करण्यासाठी या बचतगटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे शासनाने बचतगट स्थापन करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये बचतगटांची स्थापना झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमाने विविध योजनांची काही प्रमाणात अंमलबजावणी झाल्याने महिलांमध्ये जागृती वाढत आहे. या जागृतीमुळेच नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील महिला बचतगटाला यंदाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. परंतु चंद्रपूर शहरातील विविध प्रभागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बचतगटांची परिस्थिती निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी बचतगट स्थापन केले पण स्वयंरोजगार व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणतर व्यवसाय उभारावा, याबाबत त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.मनपाने सुरूवातीला महिला बचतगटांना मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली. त्यामुळे बचतगटांची संख्या वाढली. पण अजुनही मोठा उद्योग उभारता आला नाही. बचतगटातील महिलांना स्वयंरोजगार मिळविणे कठीण जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक कल्याणाच्या योजना राबविताना महिला बचतगटांना प्राधान्य देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले़ मात्र शहरातील बचतगटांना आर्थिक लाभाच्या योजनांची माहिती दिलीच जात नाही, असा आरोप महिलांनी केला आहे.प्रशिक्षणाचा अभावमहिला बचत गटांना लोकशाही व्यवस्था, पंचायतराज, सामाजिक न्याय, शासनाचे विविध योजना तसेच प्रबोधनपर विविध पैलुंची माहिती देण्यासाठी कक्ष तयार केले होते. बचतगटातील महिला प्रशिक्षित झाल्या तर त्या आर्थिक प्रगती करण्यासाठी पुढे येऊ शकतील. हा प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. मात्र मनपाने महिला बचतगटांना प्रशिक्षित करण्याचे काम गुंडाळून ठेवले. परिणामी, शेकडो योजना असूनही या योजनांचा महिला बचतगटांना लाभ घेता येत नाही.विक्रीची व्यवस्था नाहीबाबूपेठ, सुमित्रानगर, बालाजी वॉर्ड, तुकूम, भिवापूर तसेच अन्य काही वॉर्डातील महिलांनी गृहोपयोगी वस्तू तयार करण्याचे काम सुरू केले. बचतगटांद्वारे उभारण्यात आलेल्या हा व्यवसाय विस्तारीत होउ शकतो. प्रशासनाने त्या बचतगटांनी तयार केलेल्या मालास विक्रीची व्यवस्था करून दिली नाही त्यामुळे लाखो रूपयांचे साहित्य पडून आहे. व्यवसाय उभारल्यानंतर मालाची विक्री कशी करावी याचे ज्ञान महिलांनी मिळविले पण पायाभूत सुविधा नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.बँकांकडून अडवणूकमहिला बचतगटांना व्यवसाय उभा करण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळत नाही. मनपाने प्रारंभी बँक आणि बचतगटांमध्ये समन्वयाची भुमिका घेतली होती. परंतु सद्यस्थितीत याकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक महिला बचतगटांना कर्जासाठी नकार देतात. भांडवलच नसेल तर व्यवसाय कसा उभा करावा, असा प्रश्न महिला विचारत आहेत.