शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

मूलचे उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी आजारी

By admin | Updated: August 22, 2015 01:38 IST

गरिबांना वरदान ठरू पाहणारे मूल येथील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे.

मूल : गरिबांना वरदान ठरू पाहणारे मूल येथील उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या कमतरतेमुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. ५० खाटांचे श्रेणीवर्धन असलेल्या या रुग्णालयात रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेक रुग्णांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत. एकीकडे रुग्णांची वाढती संख्या बघता वैद्यकीय अधिकारी बेजार झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे.तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता एक कोटी ६५ हजार रुपये खर्च करून ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय तयार करण्यात आले. मे २००२ मध्ये या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनप्रसंगी तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबरच आवश्यक यंत्र व सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १३ वर्षांचा कालावधी लोटत असतानासुद्धा सदर समस्यांची पुर्तता करण्यास आरोग्य प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींना देखील यश आले नाही. आजच्या स्थितीत एकुण ४६ मंजूर पदापैकी २७ पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी महत्त्वाचे वैद्यकीय अधिक्षकाचे एक पद व वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. तसेच अधिपरिचारिका वर्ग तीनच्या १२ पदांपैकी सहा पदे रिक्त आहेत. या सहा पदांपैकी एक वैद्यकीय कारणास्तव तर एक स्पर्धा परीक्षेत निवड झाल्याने फक्त चार अधिपरिचारिका कार्यरत आहेत.उपजिल्हा रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. यात अधिक्षकपदाचा कार्यभार डॉ. अनिल गेडाम यांच्याकडे आहे. उर्वरित उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार डॉ. लाडे व डॉ. पेंदोर यांच्याकडे भार आहे. डॉ. गेडाम यांना प्रशासकीय काम व सभा यातच त्याचा वेळ जातो.यातच १४ सप्टेंबरला डॉ. पेंदोर यांच्या नियुक्तीची मुदत संपत असल्याने पुन्हा वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासणार आहे. तज्ज्ञांचा अभाव असल्याने ‘आयुध’ कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने सेवा पुरविण्याचा प्रयत्न आहे. मात्र सदर सेवा तोतडी स्वरूपाची आहे. (तालुका प्रतिनिधी)