शेतकरी हतबल : मिरची पिकालाही फटका, नुकसान भरपाईची मागणीनांदाफाटा : रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात कापणीसाठी आलेला गहू पिकाचे नुकसान झाल्याचे दिसत नसले तरी फळधारणा होत असलेला गहू पाण्याने जमीनीवर झोपला आहे. तर हरभरा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे रबी हंगामाची आशा धरुन असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पावसाने निराश केले. कोरपना तालुक्यात अनेकांनी गहू पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी गव्हाची कापणी करुन शेतातच ढिग करून ठेवले मात्र तेही भिजले आहे. आवारपूर, नांदा, बिबी, पिंपळगाव, हिरापूर आदी गाव शिवारातील उभे गहू पीक जमीनीवर पडल्याने पीक भुईसपाट झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे गेल्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई, खरीपात बसलेला फटका आणि आता रबीतही पिकाची अवस्था बेकार असल्याने शेतकरी हवादिल झाला आहे. गहू पिकाचा उत्पादन खर्च १ एकरसाठी साधारणत: सात ते आठ हजार रुपये आहे. यातच १५०० ते १८०० रुपयापेक्षा अधिक भाव या पिकाला मिळत नाही. त्यामुळे शेतात कष्ट करुन हाती मात्र काहीच येत नसल्याचे शेतकरी सांगतात. यालाच पर्याय म्हणून शेतकरी हरभरा पिकाची लागवड केली आहे. मात्र पावसाने येणारे फुलोर गळला तर कुठे घाटे जमिनीवर पडल्याचेही चित्र दिसून येत आहे. कापूस पीक हातून गेल्यानंतर रबी पिकाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून तर कुणी उसणवारी पैसे मागून शेती साहित्याची खरेदी केली. परंतु निसर्गाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतातून उत्पादन निघाल्यानंतर बाजारात पिकाचे भाव कमालीचे घसरतात. हीच परिस्थिी ‘अच्छे दिन’ म्हणणाऱ्या शासनाच्या काळातही कायम असल्याच्या प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांमधून उमटत आहे. अनेक गावात शेती नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश संबंधीत अधिकारी व कार्यालयांना दिले आहे. मात्र अधिकारी कार्यालयात बसूनच पाहणी करीत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मद्दतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंडपावसाने पडलेला गहू पुन्हा फळधारणेस सक्षम राहत नाही. तो भुईसपाट होतो. त्यामुळे पुन्हा उत्पादन घेता येण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करीत गहू पिकाची पेरणी केली. परंतु, उत्पादन घरी येण्याआधीच पीक नष्ट झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील पिकांचे फार मोठे नुकसान झालेले नाही. पिकांची पाहणी करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील कृषी सेवकाला पाहणीसाठी पाढवून नुकसान आढळून आल्यास मदतीसाठी पाठपुरावा करणार. -पी. यू. चिमलवार तालुका कृषी अधिकारी, कोरपना
अवकाळी पावसामुळे गहू, हरबरा पिकांचे नुकसान
By admin | Updated: March 4, 2015 01:33 IST