शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या निष्क्रियतेमुळे २० घरकुलांवर अवैध ताबा

By admin | Updated: February 20, 2016 01:50 IST

एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील ७७७ लाभार्थ्यांना बांधून देण्यात आलेल्या घरकुलात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ....

तक्रार : जिल्हािधकाऱ्यांकडे न्यायाची मागणीबी. यू. बोर्डेवार राजुराएकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील ७७७ लाभार्थ्यांना बांधून देण्यात आलेल्या घरकुलात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारी तक्रार पालिकेलीत शेतकरी संघटनेचे विरोधी पक्षनेते प्रा. अनिल ठाकूरवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राजुरा नगर पालिकेतील मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांचे शहरातील घडामोडीवर मुळीच लक्ष नसणे ही अंत्यत गंभीर बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील हेमराज हांडे, शेख मकबुल,अनिस बेग मस्तान बेग यांच्यास २० लाभार्थ्यांना अजूनपर्यंत त्याच्या हक्काचे घरकुल मिळाले नाही. त्यांच्या ठिकाणी दुसऱ्यांनीच घरकुलाचा ताब्या मिळविला असल्याचा गंभीर प्रकार घडला असतानाही राजुराचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ व त्यांचे कर्मचारी हा प्रकार खुल्या डोळ्यांनी पाहत आहे.राजुरा शहरातील ७७७ घरकुलांची योजना ही गरीबांच्या उत्थानासाठी आहे. परंतु या घरकुल बांधकामाची पाहणी केली असता अनेक घरांना भेगा पडल्या असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी तर प्लॉस्टर झालेले नाही. अंत्यत दयनिय अवस्थेत घरकुलवासी जीवन कंठित आहेत. घरकुल वाटपात तर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. राजुरा शहरातील गरीब नागरिकांना घरकुल मंजूर झाले. घरकुल बांधकामही झाले. परंतु जे खरे लाभार्थी आहेत, त्यांच्याऐवजी दुसरेच नागरिक या घरकुलात वास्तव्य करीत आहेत. मंजूर लाभार्थ्यांमध्ये राजाराम मामिडवार, आत्माराम नरुले, राजू राऊत, रामकिसन लवंदे, अशोक दापेवार, महंमद शेर महमंद, अब्दुल रहीम, अब्दुल रऊफ, अजिज खान, प्रदीप प्रजपती, छोटेलाल प्रजापती, नुरजहा हुसेन, पुष्पा मोरे, सुलताना सादीक, सैय्यद अकबरअली, निर्मला झोडगे, शेखजानी मकबुल यांचा समावेश आहे.