शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:48 IST

तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.

ठळक मुद्देपशुपालक शेतकरी हैराण : चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.पोंभूर्णा तालुक्यातील गावांमध्ये चराईसाठी काही वर्षांपूर्वी शासनाने राखीव जमीन ठेवली होती. पण राजकीय नेत्यांनी पदाचा गैरवापर केला. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले. शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण नसताना बोगस पट्टे तयार करून बांबू व इतर झाडांची कत्तल केली. त्या जागेवर ट्रॅक्टरद्वारे धानशेतीच्या बांध्या तयार केल्या. चराईचे क्षेत्र नष्ट केल्याने शेतकºयांना जनावरे चराईसाठी कुठे न्यावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी अन्य पाळीव प्राणी पालन करतात.यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती परंतु या जनावरांना चारण्याकरिता आता जागाच शिल्लक नाही. चराईचे क्षेत्र नष्ट करून त्यावर शेती केली जात आहे. आधीच सततच्या नापिकीमुळे धानपिकाचे पुरेसे उत्पादन होत नाही. जनावरांना चाऱ्यासाठी मिळणारी तणससुद्धा मिळणे दुरापास्त झाले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये चाऱ्याअभावी पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव जनावरांची विक्री केल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक विचार केल्यास आजमितीस अनेक ेगावांतील जनावरांमध्ये मोठी घट झाली.