शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळीमुळे जनआरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:44 IST

भोयगाव ते गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने खड्ड्यांमध्ये लाल माती टाकली होती.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अपघातांच्या संख्येत वाढ

आॅनलाईन लोकमतबाखर्डी : भोयगाव ते गडचांदूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे ते खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाने खड्ड्यांमध्ये लाल माती टाकली होती. मात्र या मार्गावरुन वाहने जाताना मोठ्या प्रमाणावर धुळ उडून नागरिकांच्या नाकातोंडात जाते. परिणामी अनेकांना श्वसनांचे आजार जडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील नागरिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी भोयगाव ते गडचांदूर हा मार्ग जवळ पडतो. कोरपना तालुक्यात चार कंपन्या आहेत. या चारही कंपन्यांचे ओव्हरलोड ट्रक याच मार्गाने मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे हा मार्ग पुर्णपणे उखळला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी लाल माती टाकण्यात आली. मात्र ती माती अस्ताव्यस्त पसरली आहे. परिणामी या मार्गावर अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.लगतच्या शेतातील पांढरा कापूस काळवंडलाचंद्रपूरला जाण्यासाठी अनेकजण भोयगाव ते गडचांदूर या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.मात्र वाहन गेल्यानंतर उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेतात असलेला पांढरा कापूस पूर्णपणे काळवंडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.अर्धनग्न आंदोलनाचा इशारासदर रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस, शेतकरी संघटनेने अनेकदा आंदोलन केले. मात्र शासनाने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात डांबर टाकण्याऐवजी लाल माती टाकली. मात्र धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने सदर रस्त्याची आठवडाभरात दुरुस्ती करावी, अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.नादुरुस्त रस्त्यामुळे बसफेऱ्या बंदरस्त्याची दुरवस्था बघून एसटी महामंडळाने भोयगाव-गडचांदूर या रस्त्यावरील अनेक बसेस बंद केल्या आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचा तसेच प्रवाशांना मोठी अडचण जात आहे. परिणामी प्रवशांना तिप्पट पैसे देऊन खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.