शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील धुळीमुळे कापूस काळवंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:35 IST

रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाºया धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देरस्त्याची दुर्दशा कायम : वारंवार तक्रार केल्यानंतरही कुणी लक्ष देईना !

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाल्याने मार्गालगतची पिके पूर्णत: काळवंडली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांवर धूळ उडत असल्याने पिके खराब झाली आहे. पिकांची प्रतवारीही घसरल्याने बाजारपेठेत पिकांना योग्य दर मिळत नाही. रत्यावरील उडणाऱ्या धुळीने पांढरे सोने अक्षरश: मातीमोल झाले आहे.राजुरा तालुक्यातील बहुतांश रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. वेकोलि परिसरातील बहुतांश रस्ते धुळीने माखले आहे. गोवरी-पोवनी, साखरी, वरोडा, कवठाळा, भोयेगाव, धानोरा मार्गावर रस्त्याच्या धुळीने रस्त्यालगत असलेली पिके पूर्णत: काळवंडली आहे. या रस्त्यावर दिवसरात्र जड वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात उखडलेले असून रस्त्याचे बारा बाजले आहे. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच धूळ उडत असते. धुळीमुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णत: खराब झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याला रस्त्याची दूरवस्था कारणीभूत आहे, हे स्पष्ट आहे.पिकांवर धुळीचा थर बसत असल्याने पिकांचा टवटविपणा निघून जातो.परिणामी पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होत आहे. वेकोलि परिसरातून जाणारे बहुतांश रस्ते सदैव धुळीने माखले असतात. शेतपिके रस्त्यालगत असल्याने त्याचा मोठा परिणाम पिकांवर होऊन पिके काळवंडली जातात. या धुळीचा नाहक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.कापूस वेचणीला मजूर येईनारस्त्यावरून उडणाऱ्या धुळीने पिकांवरही धुळीचा थर जमा झाला आहे. पिकांत गेले तरी कपडे पूर्णत: काळेकुट्ट होतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतात कापूस वेचणीला मजूरही येत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहे. पर्यायाने शेतकऱ्यांना घरातील सदस्य घेऊ नच नाईलाजाने कापूस वेचणी करावी लागत आहे.कधी उजळणार ग्रामीण रस्त्याचे भाग्य ?राजुरा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. त्यामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणाात हाल होत आहे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी नगारिकांनी केली आहे. असे असतानाही कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.