शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 24, 2014 23:24 IST

पावसाने दांडी मारल्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

सिंदेवाही : पावसाने दांडी मारल्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात मृग नक्षत्रासह दीड महिना पाऊस आला नाही. पावसाची झड सुरू झाल्यानंतर पेरणी करण्यात आली. पुन्हा पाऊस बंद झाल्याने उगवलेले धान पऱ्हे पाण्याअभावी वाळून गेले. त्यानंतर दुबार तर काही भागात तिबार पेरणी करण्यात आली. काही प्रमाणात पाऊस आल्याने रोपटे तयार झाले व शेतकऱ्यांनी आर्थिक बाबीचा विचार न करता खासगी कर्ज घेऊन मशागत केली. परंतु १५ दिवसांपासून कडक ऊन तापत असून तयार झालेले पऱ्हे सुकू लागले आहेत. तालुक्यात ५० टक्के रोवणीसुद्धा झाली नाही. तालुक्यात ३० हजार हेक्टरमध्ये धानाची पिके घेतली जातात. त्यामध्ये पन्नास टक्के रोखणी झाली आहे. पण जी रोवणी झाली, ते रोपटेसुद्धा वाळून जात आहे. त्यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. तालुका दुष्काळग्रस्त असून नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सिंदेवाहीचे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींना तालुका दुष्काळग्रस्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. येथील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. अशीच परिस्थिती राहिली तर, या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्याला न्याय देण्यात आला. पण सिंदेवाही चिमूर, ब्रह्मपुरीला वगळण्यात आले. या तालुक्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळीस लढा उभारावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)