शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने घटलेली किंमत पावसाने वाढली

By admin | Updated: July 11, 2016 00:56 IST

तालुक्यात दमदार पावसाने पेरणीला वेग आला आहे. शेती कामासाठी पाऊस पुरेसा असला तरी शेतबांध्या भरल्याने कामांना अडचण होत आहे.

रविवार बाजारात बैलांचा अभाव : बैलजोड्यांची किंमत ५० हजारांच्या वरब्रह्मपुरी : तालुक्यात दमदार पावसाने पेरणीला वेग आला आहे. शेती कामासाठी पाऊस पुरेसा असला तरी शेतबांध्या भरल्याने कामांना अडचण होत आहे. अश्यात काही भागात शेतकामासाठी बैलजोड्या मिळत नसल्याने व वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध होत नसल्याने, बैलजोडयांची आवक कमी झाल्याने किंमत वाढलेली असल्याचे ब्रह्मपुरीच्या रविवारच्या बैलबाजारात दिसून आले. एरव्ही दुष्काळाने बैलाची महत्त घटवले होते परंतु पावसाने किंमत वाढविली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी येथील बैलबाजार सर्वाधिक उलाढालीचे केंद्र आहे. रविवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडी बाजारात पवनी, भुयार, चिमूर, सिंदेवाही, नागभीड, आरमोरी, वडसा अशा विविध ठिकाणाहून बैल येत असतात. ब्रह्मपुरी येथील बैलबाजार हा मुख्यत: बैलजोडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची मागणीसुद्धा सर्वदूर होती. आजूबाजूच्या ठिकाणावरून अनेक व्यापारी व दलाल बैलजोडी खरेदी, विक्रीसाठी येत असतात. परंतु पावसाने जोरदार सुरवात केल्याने शेती मशागतीसाठी वेग आला आहे. एरव्ही ३० ते ३५ हजार रुपयांना मिळणारी जोडी आजच्या बाजारात ५० हजारांच्यावर गेल्याने पावसाने किंमत वाढविलेली आहे. मात्र अनेक दावणींना बैल बांधल्या नसल्याने दावण्या सुनाट आहेत. मागील वर्षी पावसाची कमतरता होती. त्यामुळे गेल्या महिन्यात बैल बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात येत होता. तसेच बैलांची आवक असल्याने बैल खरेदीसाठी भावही आटोक्यात होते. परंतु यंदाच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याने बैलजोडीची मागणी वाढलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)खिलार बैलजोडीचा अभावशंकरपटावर निर्बंध आल्याने अलीकडे बाजारात खिलार बैलजोडीचा अभाव आढळून येत आहे. या भागात अनेक शंकरपट प्रसिद्ध होत्या. त्या पूर्ववत झाल्यास अश्या बैलजोड्यांचा बाजारात वावर वाढून बाजारपेठ पुन्हा फुलू शकते अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.