आॅनलाईन लोकमतकोठारी : बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोठारी येथील पशुवैद्यकीय उपचार केंद्रात अनेक असुविधा आहेत. परिणामी अनेक शेतकरी आपल्या पशुंची तपासणी खासगी पशू डॉक्टरकडून करीत असल्यामुळे पशुवैद्यकीय उपचार केंद्र ओस पडत आहे. नोव्हेंबर महिन्यात केवळ सहा जनावरे तर डिसेंबर महिन्यात आतापर्यंत चार जनावरांवर उपचार केल्याची नोंद आहे.कोठारी गावची लोकसंख्या दहा ते बारा हजारांच्या जवळपास आहे. या गावात शेतकºयांची व मजुरांची संख्या भरपूर आहे. शेतकºयांकडे व मजुरांकडे पशुधनाची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्याकरिता कोठारीत पशु उपचार केंद्र श्रेणी-२ तयार करण्यात आले. यामध्ये पशुधन विकास अधिकारी डी. एन. गुरुनुले व परिचय एच.व्ही. पार्थीवे कार्यरत आहेत. सद्या गुरनुले रजेवर असल्याचे समजते. अंदाजे दोन एकरात परिसरात दवाखान्याची इमारत व डॉक्टरांचे निवासस्थान वसलेले आहे. दवाखान्याची इमारत जीर्ण झाली आहे, तर डॉक्टरांचे निवासस्थानसुद्धा पडक्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथील दोन्ही कर्मचारी बाहेरगावाहून जाणे-येणे करतात.त्यामुळे जनावरांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाही. परिणामी शेतकºयांना खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तपासणी करावी लागते.दवाखान्याच्या परिसरात अस्वच्छतादवाखान्याच्या इमारत परिसरात घनदाट झाडे-झुडपी वाढलेली आहेत. त्यामुळे या परिसरात रानटी डुकरांनी बस्तान असते. आजपर्यंत परिसरातील झुडपे कधीही कापल्या गेली नाही. त्यामुळे झुडूपाने वेढलेल्या परिसरात विषारी सापांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा तर दवाखान्याच्या वऱ्हाड्यात व खोलीत साप येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे साफसफाई करण्याची मागणी होत आहे.आम्हाला अजूनही सेवाशुल्क मिळाले नाही. परिणामी रुग्णालयाची स्वच्छता योग्यप्रकारे करु शकत नाही. रुग्णालयात तपासणीच्या व उपचारांच्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहेत. पण शेतकरीच आपले पशुधन घेऊन उपचारासाठी येत नाही.-व्ही.एस. लकामी,तालुका पशु वैद्यकीय अधिकारी, बल्लारपूर.कोठारीतील पशु उपचार केंद्र सद्या श्रेणी-२ मध्ये आहे. त्यास प्रथम श्रेणीमध्ये आणण्यासाठी स्वत: प्रयत्न करीत आहे. असुविधा व अस्वच्छतेबाबत संबंधित विभागाच्या अधिकाºयांना अवगत करू.- वैशाली बुद्धलवार,जि.प. सदस्या, कोठारी
कोठारीतील पशुवैद्यकीय उपचार केंद्र पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:49 IST
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कोठारी येथील पशुवैद्यकीय उपचार केंद्रात अनेक असुविधा आहेत.
कोठारीतील पशुवैद्यकीय उपचार केंद्र पडले ओस
ठळक मुद्देसुविधांचा अभाव : महिनाभरात ८-१० जनावरांवरच उपचार