शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कंत्राटी पद्धतीमुळे नहराच्या पाणी वाटपात सावळागोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 23:35 IST

घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे.

ठळक मुद्देघोडाझरी कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष : पाणसारा वसुलीवर परिणाम

दिलीप मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : घोडाझरी तलावाचे पाणी शेतकºयांना मिळत असले तरी कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप होत आहे. त्यामुळे बºयाच शेतकºयांना पाणी न मिळाल्याने धान पीक करपायला लागले आहे.घोडाझरी तलाव शंभर टक्के भरला, तरी सुद्धा कंत्राटी पद्धतीने पाणी वाटप सुरु आहे. कंत्राटदार पाण्याचे वाटप करण्यासाठी रोजीने मजूर लावतो. ज्या शेतकºयांचे घोडाझरी सिंचन शाखेशी पाणी मिळण्यासाठी करारपत्र केलेले आहे, अशा सर्व शेतकºयांना धान शेतीला पाणी मिळायला पाहिजे. परंतु कंत्राटदाराची माणसे जे अतिक्रमणधारक आहेत किंवा ज्या शेतकºयांनी करार केले नाही, त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन पाणी देतात. त्यामुळे खºया शेतकºयांना घोडाझरीच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.घोडाझरी तलावापासून कालव्याच्या सहाय्याने पाणी आणण्याची जबाबदारी सिंचन विभागाच्या अधिकाºयांवर व कर्मचाºयांवर आहेत. मात्र यावर्षी विविध कारण पुढे करीत अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे पाणी गडबोरी कालव्याला पोहचले नाही. पाणी जास्त आणल्यास कालवा फूटणार तर काही ना ही भीती अधिकारी वर्गात होती. कारण गतवर्षी कालवा कच्चेपार व त्याच्या समोरील भागामध्ये फूटत होता. त्यामुळे पाणी वाहून जायचे. शिवाय आठ-दहा दिवस बांधकाम पूर्ण होईपर्यंत पाणी वाटप बंद असायचे.सदर कालवा दरवर्षी फूटत असल्याने शासनाने कालव्याच्या दुरुस्तीसाठी व सिमेंट लायसिंगचे काम करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. परंतु, सिमेंट लायनिंगचे काम करताना दोन-अडीच इंच थर मुरुम टाकून त्यावरच काम करण्यात आले. सिमेंटला पकड मजबूत नसल्याने आणि घराला करतात तसे प्लॉस्टर करण्यात आल्याने पहिल्याच वर्षी बºयाच ठिकाणी पाण्याबरोबर प्लॉस्टर वाहून गेले तर बºयाच ठिकाणी पाण्याअभावी पक्के न झाल्याने प्लॉस्टर उखडले आहे व भेगाही गेल्या आहेत. त्यामुळे नवरगाव-गडबोरीकडे येणाºया कालव्याची दैनावस्था आहे.पूर्वी याच कालव्यावर दरवर्षी मुरुम कालव्याच्या दोन्ही भागावर पसरवल्या जात होता. आता घोडाझरी सिंचन शाखेला परवडते की नाही, मात्र बºयाच वर्षापासून त्यावर मुरुमही टाकल्या गेले नाही. त्यामुळे बºयाच भागात कालव्याची उंचीच कमी झाल्याने या कालव्याच्या माध्यमातून जास्त पाणी आणणे धोकादायक ठरत आहे. कालव्याच्या जवळ असलेल्या शेतकºयांना दोन-तीन वेळा पाणी मिळते. परंतु ज्या-ज्या ठिकाणी उपवितरीका आहेत, त्या दोन-चार किमी लांब आहेत. अशा ठिकाणी दोन महिने कालव्याने पाणी येत असले तरी शेवटच्या टोकावर पाणीच पोहचत नाही.दरवर्षीच्या या त्रासाला कंटाळून जे मोठे शेतकरी आहेत, अशा शेतकºयांनी स्वत:च्या शेतामध्ये बोरवेल मारले. ते संबंधीत विभागाकडे तक्रार करण्यास येत नाहीत. शेवटच्या शेतकºयाने मेहनत करुन पाणी नेण्याचा प्रयत्न केल्यास काही मधले शेतकरी पाणी जवळ आल्यास आडवे होऊन पाणी अडवतात. त्यामुळे शेवटचे शेतकरी पाणसारा देतात. परंतु झगडा-भांडण नको असे म्हणत शांत राहतात. पूर्वी सर्वच शेतकºयांना पाण्याची गरज पडत असल्याने पाच- पन्नास शेतकरी एकत्र होऊन संबंधीत कार्यालयात येऊन अधिकाºयांना पाण्याचा गेज वाढविण्यास बाध्य करीत होते. मात्र अलीकडे शेतकºयांना पाणी मिळणे कठीण झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.