शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामामुळे पुरातन विहिरीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:27 IST

येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये नाराजी : ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभिसी : येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालगत असलेली पुरातन विहीर सुरक्षित ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.शंकरपूर ते भिसी, जामगाव, गदगाव, चिमूर, मासळ, पिपर्डा, मार्गे पेठगावापर्यंत जाणारा हा मार्ग ताडोबा अभयारण्याला अगदी लागून आहे. शंकरपूर ते भिसी, गडपिपरी या गावाजवळ एक पुरातन विहीर असून ३५ ते ४० पायऱ्या आहेत. ही पायऱ्यांची विहीर नावाने ओळखल्या जाते. या विहिरीचे बांधकाम ३५० ते ४०० वर्षांपूर्वी झाल्याचे पुरातत्त्व अभ्यासकांचे म्हणणे आहे. भिसी येथील पुरातन भोसलेकालीन शिवमंदीरसुध्दा याच काळातील आहे. मंदिर व पायºयांच्या विहिरीचे बांधकाम एकसारखे आहे. बांधकामात वापरलेले दगड सारखेच असून वास्तू एकसारखी आहे. परिसरात अशा पध्दतीच्या पायºयांच्या विहिरी तीन ठिकाणी आहेत. आंबाई- निंबाई, लिंगोबा देवस्थान व गडपिपरी गावाजवळची एक अशा एकूण तीन विहिरी अजूनही अस्तित्व राखून आहेत. पुरातत्त्व विभागाचे या पुरातन वास्तुंकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. सन २००६ -०७ मध्ये गडपिपरी गावासाठी जलस्वराज्य योजनेअंतर्गत १८ लांखाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. या योजनेतील विहीर पायऱ्यांच्या विहिरीपासून अगदी लागून बांधण्यात आली.त्यावेळी भिसी येथील काही पुरातत्त्वप्रेमींनी त्या बांधकामाचा विरोध केला होता. परंतु संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कंत्राटदाराने चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली आणि पाठपुरावा करून बांधकाम पूर्ण करून घेतले. शंकरपूर ते पेठगाव या राज्य मार्गाची रूंदी १० मीटर असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बांधकाम करण्यात येणाऱ्या बाजुलाच ही विहीर आहे. युनिटी हायब्रीड नावाच्या या राज्य मार्गाला अधिक जागा लागत असल्याने ऐतिहासिक विहीर नष्ट करण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. या विहिरीचे संवर्धन करून ऐतिहासिकेतचा अभ्यास केल्यास नवीन इतिहास पुढे येऊ शकतो.पुरातन वास्तुंचे जतन करण्यासाठी विशेष निधीची तरतूद असते. पायऱ्यांच्या विहिरींचे जतन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार सुरू केला आहे.- युवराज मुरस्कर, अध्यक्ष ट्री फाऊंडेशन, चिमूरपायºयांच्या विहिरीपासून रस्त्याची रुंदी कमी केल्या जाईल. पुरातन वास्तूला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येईल.- समीर उपगंडलावर, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिमूर