शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेमुळे ग्रामपंचायतींची विकास कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 23:49 IST

नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे.

ठळक मुद्दे१४ आॅक्टोबरला मतदान : ५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच घोषित केला आहे. त्यामुळे निवडणूक असणाºया ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र या आचारसंहितेचा फटका ग्रामपंचायतींच्या विकास कामांना बसला असून निवडणूक होईपर्यंत विकास कामे आता अडली आहेत.सार्वत्रिक निवडणूक असणाºया ग्रामपंचायतींमध्ये मूल तालुक्यातील बाबराळा, चकदुगाळा, बोंडाळा खूर्द, बेंबाळ, गडीसुर्ला, उश्राळा व आकापूर या ७ ग्रामपंचायती तर बल्लारपूर तालुक्यातील बामणी दु., कोठारी, काटवली, कवडजई, इटोली या पाच, नागभीड तालुक्यातील मिंथूर, मांगली अरब, चिखलगांव, गोविंदपूर, गिरगाव, पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा बोरकर, बोर्डा झुलुरवार, राजूरा तालुक्यातील विरुर स्टेशन, देवाडा, डोंगरगांव, हरदोना खुर्द, कोरपना तालुक्यातील कुकुडसाथ, येरगव्हाण, कवठाळा, कोळशी बुज, विरुर गाडे, अंतरगाव, माथा, बाखर्डी, निमणी, भद्रावती तालुक्यातील चिचोली, धानोली, चारगाव, विस्लोन, रानतळोधी, गुंजाळा, टेकाडी, चिमूर तालुक्यातील आमडी बेगडे, रेंगाबोडी, सोनगाव वन, सावरी बिडकर, जिवती तालुक्यातील लांबोरी, धनकदेवी, नंदप्पा, चंद्रपूर तालुक्यातील धानोरा, येरुर, जुनोना, चोरगाव दाताळा व वरोरा तालुक्यात दहेगाव अशा ५२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.शासनाकडून यावर्षी अनेक ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाचा निधी दिला आहे. या निधीतून लाखो रूपयांची कामे ग्रामपंचायत स्तरावर सुरू आहेत. यात रस्ते, नाली, विहिर, पाणी पुरवठा योजना अशी कामे केली जात आहेत. कोठारी येथे पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होवून योजनेचे ४ सप्टेंबरला लोकार्पण होणार होते. मात्र आचारसंहितेमुळे ही कामे अडली आहेत.२३ सप्टेंबरला जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत असून या गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमनिवडणूक होणाºया सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्य पदासाठी १४ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तहसिलदार यांनी निवडणुकांची नोटीस प्रसिध्द करण्याची तारीख १४ सप्टेंबर असून नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करणे २२ ते २९ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत चालणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी तर ५ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. त्याचदिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढणाºया उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान होणार असून मतमोजणी १६ आॅक्टोबर रोजी होणार आहे.