शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईच्या धास्तीने आरोपी न्यायालय परिसरातून पसार

By admin | Updated: April 11, 2015 01:02 IST

गांजा व चामडी प्रकरणात आपल्यावर कारवाई होणार या धास्तीने न्यायालयात तारखेवर आलेला आरोपी वनविभागाच्या

ब्रह्मपुरी येथील घटना : गांजा व चामडी प्रकरणब्रह्मपुरी : गांजा व चामडी प्रकरणात आपल्यावर कारवाई होणार या धास्तीने न्यायालयात तारखेवर आलेला आरोपी वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. सदर घटना ब्रह्मपुरी न्यायालय परिसरात शुक्रवारी तीन वाजताच्या सुमारास घडली.ब्रह्मपुरी येथील अश्विनी किराणा दुकानात एका स्पोटर्स बॅग मध्ये गांजा व चामडी ठेवून पसार झालेला आरोपी महेश तिमाजी देसाई व जयराम तटरीराम मडावी यांना ब्रह्मपुरी पोलिसांनी जेरेबंद केले होते. महेश देसाई याला चंद्रपूर न्यायालयातून जामीन मिळाला. तो आज ब्रह्मपुरी न्यायालयात तारखेवर हजर होण्यासाठी न्यायालय परिसरात आला असता, त्यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी वनविभाग पाळत ठेवून आहे, असा संशय येताच आरोपीने वनविभागाच्या हातावर तूरी देऊन पळ काढला. मात्र स्टेशन रोडवर एका घरी लपून बसलेल्या आरोपीला पकडण्यात वनविभागाला यश आले. फिर्यादी मोरेश्वर करंबे यांना फसविण्याच्या डावात आरोपींचा डाव फसला. गांजा प्रकरणात पोलिस विभागाची कार्यवाही झाली असता, चामडी प्रकरणात वनविभागाची कारवाई होणे बाकी होते. आरोपी हा दोनही विभागाचा आरोपी होता. परंतु, कारवाई पोलीस विभागाची झाली नंतर वनविभाग कारवाईसाठी वाट पाहत होता. पोलिसांच्या कार्यवाहीनंतर दोघांनाही चंद्रपूर येथे न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. नंतर आरोपी महेश देसाईची सुटका झाली तर दुसरा आरोपी जयराम मडावी कोठडीतच आहे. शुक्रवारी ब्रह्मपुरी न्यायालयात आरोपी महेश देसाई तारखेवर हजर होण्यासाठी दुपारी तीन ते चार वाजताच्या दरम्यान आला. तेव्हा वनविभागही त्याच्यावर पाळत ठेवून होता. ही बाब आरोपीच्या लक्षात येताच त्याने न्यायालयातून पळ काढला व थेट धावत जाऊन शिवाजी चौक, बुरड मोहल्ला, पेठवार्ड असा प्रवास करीत एका घरी लपून बसला. तेथे पोलीस व वनविभाग आरोपीला शोधले असता, तो सापडला. वनविभागाने त्याला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (तालुका प्रतिनिधी)