शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी पहाडावरील कोलाम आदिवासींचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:32 IST

तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे. कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही.

ठळक मुद्देसमस्या : तालुक्याशी तुटतो संपर्क

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील माणिकगड पहाडावरून शहराला जोडणारे अनेक रस्ते पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे रस्त्यांअभावी कोलाम आदिवासींना पावसाळ्यात संकटांचा सामना करावा लागणार आहे.कोरपना तालुक्याच्या निर्मितीला २५ वर्षे झाली. मात्र रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. उत्तरेकडील भारोसा, इरई, विरुर, अंतरगाव, पिपरी, कोडसी बुज व अकोला, पारडी, कोठोडा, परसोडा, दक्षिणेकडील थिप्पा, उमरहिरा, जाभुलधरा - टांगाळा - सावलहिरा, येरगव्हाण, पिपर्ड, चिंचोली, वडगाव, इंजापूर, बैलमपूर, मानोली, पूर्व भागातील उपरवाही, धुनकी, बाखर्डी, नवेगाव-वरोडा हे रस्ते अद्यापही थेट जुळली नाही. बाखर्डी, नांदा, कढोली, नारंडा, जेवरा, गांधीनगर, कान्हाळगाव, कोरपना, कुसळ, पिपर्ड, नारंडा, लोणी, शेरज, कोडसी गावे अजुनही एकमेकांशी जुळू शकले नाही. सावालहिरा, येल्लापूर, बोरगाव, सिंगार पठार, शिवापूर आदी राज्य सीमा मार्ग रखडला आहे. कागदावर प्रस्तावित आराखडा तयार असला तरी कामाला सुरुवात झाली नाही. दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा अनुशेष तातडीने दूर करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.