शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:52 IST

मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे.

ठळक मुद्दे५४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी सज्ज : पेरणीची वेळ गेल्यास मोठा फटका

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मृग नक्षत्र कोरडा गेल्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले. पेरणीची वेळ गेल्यास मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.तालुक्यातील खरीप हंगामाच्या पेरणीचे क्षेत्र ५८ हजार ८४८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. सुमारे ५४ हजार ३४८ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी अपेक्षित असते. मात्र, यंदा २० जून उजाडला तरी पावसाचे आगमन झाले नाही. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला आणि मृग नक्षत्राच्या दिवशी काही गावामध्ये पावसाने हजेरी दिली. मात्र, तेव्हापासून पत्ता नाही. १९७२ नंतर पहिल्यांदा असे चित्र पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. हवामान खात्याने यंदा पाऊस कमी प्रमाणात असल्याचा अंदाज वर्तविला. तर दुसरीकडे ७ जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्राने पाठ फिरविली. यंदा पेरणीला उशीर झाल्याने कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अनिष्ट परिणाम होणार आहे. पेरणीचा कालावधी निघून गेल्याने कापूस, सोयाबीनप्रमाणे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. लवकर लागवड केल्यास कापसाचे अपेक्षित उत्पादन होते. कापूस लागवडीला उशीर झाल्यास उत्पादन घटते, असा अनुभव शेतकरी सांगतात. हवामानाचा परिणाम कापसावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आर्द्रा नक्षत्राकडे लागल्या आहेत.चिमूर, खडसंगी, शंकरपूर, भिशी, नेरी परिसरात शेतीच्या मशागतीची कामे झाली. नांगरणी, वखरणी, पºहाट्या वेचणीची कामे पूर्ण झाली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहे. पण जमीन तापून असल्याने दमदार पाऊस पडल्याशिवाय पेरणी करता येणार नाही. मागील वर्षी धानाचे मोठे नुकसान झाले. शेकडो शेतकºयांना कर्जाचा भरणा करता आला नाही. यंदा हिच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे जगणे कठीण होईल, असे चित्र दिसून येत आहे.शेतकरी हवालदिलयावर्षी पाऊस मृग नक्षत्रात येणार, असे चिन्ह दिसत होते. मात्र, मृग नक्षत्र संपत आल्या नंतरही अद्याप पाण्याच्या थेंबाकरिता चिमूर, भिशी, शंकरपूर, जांमभूळघाट, आमडी, रेंगाबोडी, बोथली, वाहानगाव, नेरी, मोटेगाव आदी गावातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. दररोज ढगाळ वातावरण तयार होते. गार वारा सुटतो. हे पाहता पाऊस येणार, पेरणी होणार असे शेतकरी मनोमन पक्के करतो. मात्र, पावसाने अद्यापही हुलकावणीच देत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस