शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी उभे पिके करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:00 IST

पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाची छाया : शेतकºयांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या कडक उन्ह तापत असल्याने उगवलेले पीक करपन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.जून महिन्यात पावसाची सुरूवात तशी चांगलीच झाली. यावेळी शेतकºयांनी कशाचीही पर्वा न करता वेळेवर पेरण्या केल्या. जमिनीतून पीक उगवले, पण पावसाने नंतर जी दडी मारली, ती उभ्या पिकांचा बळी घेतल्यानंतरच येईल, असेच चिन्ह दिसून येत आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसरात कापसाचे पीक एवढे बहरून आले आहे की, ते बघितल्यानंतर येणारी दिवाळी शेतकºयांसाठी चांगली जाईल, असे दिसून येते. मात्र दडी मारलेल्या पावसाने बळीराजा चिंतातूर झाला आहे.धान पºहे करपली, शेतकºयांची धडधड वाढलीतळोधी (बा) : अपुºया पावसामुळे रोवणीचे कामे पूर्णपणे खोळंबली असून धान पºहे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तळोधी (बा) येथील सामाजिक कार्यकर्ते बल्लू गेटकर यांनी केली आहे. या भागातील शेतकरी वर्ग पूर्णपणे धान पिकावर अवलंबून असून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या भागातील घोडाझरी तलावात केवळ ३२.१८ टक्के जलसाठा असून नदी-नाले, बोड्या सुद्धा पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. काही शेतकºयांनी विहीर, बोरवेलच्या पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र रोवणीचे पीक करपून गेले आहे.उन्हाचा तडाखाराजुरा : बºयाच दिवसापासून पावसाने दडी मारली असून सूर्यनारायण मात्र तापत आहे. त्यामुळे शेतातील ओलावा सुकून गेला आहे. शेतातील कापूस व सोयाबीनचे रोपे कोमेजून जात असून ओलिताची सोय नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. महागडे बी-बियाणे व खत खरेदी करून पेरणी केली. पावसाने सुरवातीस योग्य साथ दिली. शेतकºयांनी मशागत करून रोपाची वाढ केली. परंतु, अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे ओलावा सुकुन गेला असून आता पाऊस आवश्यक आहे.