शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 06:00 IST

व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी व्यवस्थापनाची सूचना धुडकावित संप शंभर टक्के यशस्वी केला. भारतीय मजदूर संघ या आंदोलनात सहभागी नसल्याचे व्यवस्थापनाने सांगून कामगार संघटनांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवेकोलि कर्मचारी संपावर : वेकोलिला कोट्यवधींचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : केंद्र सरकारने कोळसा खाणीत शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीला दिलेली मंजुरी मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसह चार ज्वलंत मागण्यासाठी कोल इंडीयातील केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या एक दिवशीय बंदला वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात जोरदार समर्थन मिळाले. इंटक, आयटक, एचएमएस, सिटू आणि भारतीय मजदूर संघ या कामगार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.२४ सप्टेंबरला सकाळी ७ वाजतापासून शेकडो कामगार सास्ती टाऊनशीप येथील मुख्य महाव्यवस्थापक कार्यालयापुढे जमले. यानंतर या कामगारांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. येथून हे कामगार सर्व कोळसा खाण परिसरात फिरले. क्षेत्रातील सास्ती एक्सपान्शन, गोवरी, पोवनी, गोवरी डीप, बल्लारपूर या ओपनकास्ट व सास्ती, बल्लारपूर भूमिगत तसेच क्षेत्रीय कार्यालय या सर्व कार्यालय आणि माईन्समध्ये फक्त अधिकारी कामावर होते. त्यामुळे कोळसा व माती उत्खनन पुर्णपणे बंद होते. कोळसा डिसपॅचही ठप्प होते. एकही ट्रक अथवा रेल्वे वॅगनमध्ये कोळसा भरण्यात आला नाही. या आंदोलनात ठेकेदारी मजुरांनी सहभाग घेतला. ठेकेदारी पध्दतीने माती उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांनी कामगाराअभावी उत्खनन बंद ठेवले.सास्ती व गोवरी टाऊनशीप येथे झालेल्या कामगारांच्या सभेत मान्यवरांनी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी नितीचा जाहीर निषेध केला. सरकार श्रम करणाऱ्या कामगारांचे हक्क हिरावून घेऊन संघटनांना कोळसा उद्योगातून बेदखल करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत सर्व कामगारांनी एकजूट ठेवून संघर्ष करण्यास सिध्द व्हावे, असे आवाहन केले.व्यवस्थापनाने नोटीस काढून कामगारांना आंदोलनात सहभागी न होण्याचे आवाहन केले आणि संपात भाग घेतल्यास कार्यवाही करण्याची सूचना दिली. मात्र कामगारांनी व्यवस्थापनाची सूचना धुडकावित संप शंभर टक्के यशस्वी केला. भारतीय मजदूर संघ या आंदोलनात सहभागी नसल्याचे व्यवस्थापनाने सांगून कामगार संघटनांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याला आक्षेप घेत भामसंचे नेते अनिल निब्रड यांनी भामसंचा संप सुरुच असल्याचा निर्वाळा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे केंद्रिय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के, मधुकर ठाकरे, रायलिंगू झुपाका, दिलीप कनकूलवार, इंटकचे आर शंकरदास, सुदर्शन डोहे, रामनरेश यादव, ईश्वर गिरी, एचएमएसचे अशोक चिवंडे, लोमेश लाडे, प्यारेलाल पुंडे, संग्रामसिंह, सिटूचे शेख जाहीद आदींनी केले.माजरी पूर्णपणे बंदमाजरी : वेकोलि माजरी येथे पाचही कामगार संघटनाने बंद पुकारले असून हे संप शंभर टक्के यशस्वी झाले आह. आज माजरीचे कोळसा उत्पादन, कोळसा वाहतूक, डिस्पॅच, पाणी फिल्टर प्लांट सर्वच बंद आहे. या बंदमुळे वेकोलि माजरीला करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जर मागणी पूर्ण झाली नाही तर दिल्ली येथे आंदोलन करू, असा इशारा एचएमएसचे अध्यक्ष जयणारायण पांडे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी इंटकचे सचिव धनंजय गुंडावर ,एचएमएसचे दत्ता कोंबे, आयटकचे अध्यक्ष दीपक ढोके, बंडू उपरे, सिटू अध्यक्ष मेहमूद खान, बिरेंद्र गौतम, बीएमएसचे दीपक डोंगरावर, विवेक फालके आदी उपस्थित होते.ऊर्जाग्राममध्ये निदर्शनेताडाळी : महाप्रबंधक कार्यालय वणीक्षेत्र उर्जाग्रामच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर इंटक, एसएमएस, एटक, सिटू, अशा चारही कामगार संघटनांनी संयुक्त एक दिवसीय संप पुकारला. यावेळी वेकोलि कर्मचाऱ्यांनी खाण परिसरातच शासनाच्या विरोधात निदर्शने केली. घुग्घूसच्याही खाणी बंद होत्या.अशा आहेत मागण्याकोळसा उद्योगात शंभर टक्के एफडीआयचा निर्णय रद्द करावा.सर्व कोल कंपनी मिळून एकच कोल इंडीया कंपनी बनवावी.कोळसा खाणीतील ठेकेदारी प्रथा बंद करुन सर्व कंत्राटी कामगारांना नोकरीत नियमित करावे.कामगारांसाठी सुरु असलेल्या मृत्यूनंतर आश्रितांना नोकरी देण्याची योजना पूर्ववत सुरु ठेवावी.

टॅग्स :Morchaमोर्चा