शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षलागवडीसाठी खोदलेल्या खड्ड्यांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 23:50 IST

वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे.

ठळक मुद्दे३३ कोटी वृक्ष लागवड । विश्वासार्हता बळकट करण्याचा प्रयत्न

उदय गडकरी ।लोकमत न्यूज नेटवर्कसावली : वृक्ष लागवडीमध्ये कुठेही उणीव राहू नये, पर्यावरण बचाव आणि जनहितार्थ असलेल्या मोहीमेबाबत विश्वासार्हता मजबूत व्हावी, या हेतूने जिल्ह्यात सर्वात जास्त वृक्ष लागवडीचे उद्दीष्ठ असलेल्या सावली विभागाने वृक्ष लागवडीची जय्यत तयारी आहे. शिवाय खोदण्यात आलेल्या खड्ड्यांची ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच वृक्षलावडीच्या कार्यक्रमात ड्रोम कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे. हीच बाब या मोहिमेवर विश्वासार्ह्यता निर्माण ठरत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात महाराष्ट्र शासनाने ५५ कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला आहे. त्यापैकी ३३ कोटी वृक्ष लागवड यावर्षी करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीसाठी खोदण्यात आलेले खड्डे १ जूनपूर्वीच तयार करण्यात आले आहेत.यावर्षी पावसाने दगा दिल्याने हा कार्यक्रम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी खोदलेले खड्डे खरोखरच खोदले की नाही याची खातरजमा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोन कॅमेराद्वारे खड्ड्यांची प्रत्यक्ष तपासणी केली जात आहे. शिवाय वृक्ष लागवडीनंतरही पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे.सावली वनपरिक्षेत्रांतर्गत ३४ ठिकाणी रोपवन घेण्यात आले असून सुमारे ७२७ हेक्टर इतक्या जागेत सात लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ठ सावलीला असून त्यानंतर वरोरा वनपरिक्षेत्राचा क्रमांक लागतो.यावर्षी पहिल्यांदाच ड्रोन कॅमेराद्वारे वृक्ष लागवडीची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्यक्ष खोदलेले खड्डे, लावण्यात येणाºया वृक्षांची माहिती मिळणार आहे. या प्रयोगामुळे वनविभाग तसेच वनाधिकाºयांवरील विश्वासार्हता वृद्धींगत होईल.- जी.व्ही. धांडेवनपरिक्षेत्राधिकारी, सावली

टॅग्स :forest departmentवनविभाग