शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांनो, ही जीवघेणी स्पर्धा कुणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2022 05:00 IST

रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.  एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो.

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या वर्दळीच्या मार्गावर शुक्रवारी झालेला भीषण अपघात वाहनचालकांसाठी धडा आहे. ज्याची चूक होती आणि ज्याची चूक नव्हती अशा दोघांचाही मृत्यू झाला. या अपघाताने रस्ता सुरक्षेवरच अनेक प्रश्न लावले आहे.रस्त्याचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात.  एकाने ते पाळले नाही तर होत्याचे नव्हते होते. मग स्वत:चा जीव मुठीत घेऊन रस्ते नियम कुणासाठी आणि का मोडतो? ही बाब प्रत्येक वाहनचालकांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे. एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी प्रवासी वाहने प्रवाशांना जनावरांसारखे कोंबून धावत आहे. ते वाहन नियोजित स्थळी पोहचेपर्यंत जिवात जीव नसतो. याची जाणीव त्या वाहनाच्या चालकाला नसेल आणि तो आपल्याच तालात वाहन हाकत असेल तर हा जीवघेणा खेळ कधीच थांबणार नाही. त्या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या एका प्रवाशाने जे सांगितले हे भयावह आहे. ट्रॅव्हल्सचा जामनंतरचा प्रवास थरकाप उडविणारा होता. चालक मोठमोठ्याने गाणे वाजवत होता. तो मागे वळून प्रवाशांसोबत गप्पाही मारत होता. मोबाइलवरही बोलायचा. आनंदवन चौकानंतर मोबाइलवर संभाषण सुरू असतानाच घात झाला. लगेच ट्रक आडवा आला. यात दोन्ही चालकांचा जीव गेला. तो ट्रक नसता तर मृतांचा आकडा वाढला असता, असे तो म्हणाला. रस्त्याने शेकडो वाहने धावत असतात. एकाची चूक अनेकांना भोगावी लागते. त्याचे परिणाम दूरगामी असतात. स्वत:चा जीव नेहमी धोक्यातच असतो. हे प्रत्येक चालकाने ध्यानात ठेवण्यासारखे आहे. प्रवासी वाहनचालक असे बेजबाबदारपणे वाहन का हाकतात? याला त्या वाहनाचे मालकही तेवढेच जबाबदार आहे. पैशाच्या हव्यासापोटी त्यांनीच ही जीवघेणी स्पर्धा सुरू केलेली असते. पुढच्या थांब्यावरील प्रवासी मिळविण्यासाठी ही स्पर्धा असते. यामध्ये जीव जाईल तो चालकाचा आणि प्रवाशांचा, मालक मात्र सुखरूप असतो. विम्याच्या आधारे दुसरे वाहन मिळेल, पण गेलेला जीव परत मिळत नाही. मग चालकाने का म्हणून ही जीवघेणी स्पर्धा करावी? प्रत्येक दिवस सारखा नसतो. हे या अपघातातून शिकले तर मिळविले.

ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा : खासदारचंद्रपूर :  एसटी बस दोन महिन्यांपासून बंद असल्याने अधिकचा नफा कमावण्याच्या हेतूने प्रवाशांचा जीव वाहनचालक टांगणीला लावत आहेत. जिल्ह्यातून धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवा, असे निर्देश देणारे पत्र खासदार बाळू धानोरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व  सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र खैरकर, पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर - नागपूर, चंद्रपूर - गडचिरोली, चंद्रपूर- ब्रह्मपुरी तसेच चंद्रपूर-पुणे मार्गावर जाणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कार्यरत आहेत. ट्रॅव्हल्सच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ उपायोजना कराव्यात, अनियंत्रित वेगासाठी किती खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली याची माहिती सादर करावी, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी केली.

 

टॅग्स :Accidentअपघात