शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकाची रात्र डासांसोबत एसटीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिद जोपासत एसटी महामंडळाने सगळीकडे वाहतुकीचे जाळे पसरविले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीला ...

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रिद जोपासत एसटी महामंडळाने सगळीकडे वाहतुकीचे जाळे पसरविले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीला महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’असे म्हटल्या जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारामध्ये सुमारे २२५ बसच्या १४०५ फेऱ्या होतात. त्यापैकी चंद्रपूर आगार २७, राजुरा १८, वरोरा ११ चिमूर १७ अशा जवळपास ७० बस विविध गावांमध्ये मुक्कामी असतात. मुक्कामी बसेस सायंकाळी निघतात. सकाळी पुन्हा प्रवाशांना घेऊन संबंधित आगारात जातात. मात्र या बसमध्ये मुक्कामी असणाऱ्या चालक व वाहकांना विविध अडचणींना सामोर जावे लागते. महामंडळाच्या बसस्थानकावर झोपण्याची व्यवस्था नाही. काही ठिकाणी ग्रामपंचायत व पोलीसपाटीलच्या मार्फत व्यवस्था करण्यात येते. परंतु, अनेक ठिकाणी कोणतीही व्यवस्था नसल्याने बसमध्येच झोपावे लागते. पूर्वीच्या बसमध्ये झोपण्याची व्यवस्था असायची परंतु, आताच्या ‘टू बाय टू’ च्या सीट असल्याने अशी व्यवस्था नसल्याने मोठी पंचायत होते.

बॉक्स

शौचालयासाठी अडचण

शासनाच्या प्रयत्नामुळे गावखेडे हागणदारीमुक्त झाले आहेत. मात्र अनेक बसस्थानक, प्रवासी निवारा येथे शौचालय नाही. जसे सोनापूर, पाणोरा या बस मुक्कामी असलेल्या बसस्थानकावर शौचालय नाही. परिणामी चालक व वाहकांची मोठी पंचायत होते. अनेक ठिकाणी उघड्यावर शौचालयास गेल्यास ग्रामपंचायतीकडून दंडही ठोठावण्यात येत असतो.

बॉक्स

कोरोनामुळे मदतीसाठी कुणी पुढे येईना

सध्या सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. बसमध्ये चालक-वाहक सेवा देताना प्रवाशांच तिकीट काढताना त्यांचा संबंध येतो. त्यामुळे सर्वांत मोठी जोखीम आहे. रात्री गावात मुक्कामी असताना गावात त्यांना कोणतीही अडचण गेली, तर नागरिकांची मदतही मिळत नाही. कोरोनामुळे कुणी मदतीसाठी पुढे येत नसल्याचे अनुभव अनेकदा चालक व वाहकांना आला आहे.

कोट

पूर्वीच्या गाड्यामध्ये झोपण्याची व्यवस्था होती. परंतु, आता टू बाय टूच्या सीट असल्याने झोपण्यास मोठी अडचण जाते. तसेच अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसल्याने चालक-वाहकांची मोठी अडचण जाते. याबाबत वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे. मात्र दखल घेण्यात आली नाही.

- दत्ता बावणे, विभागीय सचिव महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना

कोट

बस मुक्कामी असलेल्या गावात वाहक व चालकांची सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडून झोपण्याची व्यवस्था करण्यात येते. बसमध्येसुद्धा झोपण्याची व्यवस्था असते. चालक व वाहकांची तक्रार आल्यास आगार व्यवस्थापक त्याची दखल घेऊन ती तत्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

-सेवाराम हेडावू विभाग नियंत्रक, चंद्रपूर

कोट

वडेगाव, सावरी, येथे कसलीही झोपण्याची व्यवस्था नाही. बसमधील टू बाय टू सीट असल्याने तेथेसुद्धा झोपण्यास अडचण जाते. अनेक ठिकाणी शौचालय नसल्याने बाहेरच जावे लागते.

-मुर्लीधर मोहितकर, चालक

कोट

शिवणी, सोनापूर, मुकूटबण, पोंभुर्णा, पाणोरा येथे ग्रामपंचायतीतर्फे कार्यालयात झोपण्याची व्यवस्था करण्यात येते. भद्रावती सारख्या बसस्थानकावर झोपण्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे बसमध्येच झोपावे लागते. मच्छरांचा त्रास होतो.

-नितीन लाकडे, वाहक