शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

भगिरथच्या घरकुलाचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 23:48 IST

घरकुलासाठी पात्र असूनही अपात्र दाखवून वंचित ठेवण्याचा डाव घाटकुळ ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘भगिरथ’ने पोंभूर्णा पं.स.समोर उपोषण केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.

ठळक मुद्देपात्र लाभार्थ्यांना डावलले : उपोषणानंतरही पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून बोळवण

विराज मुरकुटे।आॅनलाईन लोकमतपोंभूर्णा : घरकुलासाठी पात्र असूनही अपात्र दाखवून वंचित ठेवण्याचा डाव घाटकुळ ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी ‘भगिरथ’ने पोंभूर्णा पं.स.समोर उपोषण केले. मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. घरकुलासाठी संघर्ष करणाऱ्या भगिरथचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.घाटकुळ ग्रा.पं.मध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाची यादी तयार करण्यात आली. यामध्ये ग्रा. पं. पदाधिकारी व अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे ठराव न घेता मर्जीने गरीब व पात्र लोकांची नावे वगळून गरीब शेतमजूरांना पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित ठेवल्याचा आरोप भगिरथ झाडे यांनी आरोप केला आहे.ग्रामसभा तहकूब दाखवून केवळ औपचारिकता ठेवून ठराव लिहिण्यात आला. यावर भगिरथ झाडे व इतरांनी आक्षेप नोंदविला. एवढे करूनही न्याय मिळाला नाही. घरकुलसाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. पण, निकषाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पं. स. चे उपसभापतींच्या गावातच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र स्थानिक पुढारी व तालुका प्रशासनाचेही जाणीवपूर्वक दूर्लक्ष सुरू असल्याचा आरोप होत आहे. घरकुलसाठी पात्र असूनही लाभ का नाही, यासाठी प्रशासनाच्या विरोधात उपोषण केले होते. न्याय मिळविण्यासाठी पंचायत समितीसमोर कुटुंबांसोबत ठिय्या मांडला होता. पण, संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन देवून विषयाकडे कानाडोळा केला. शासनाकडून अनेक योजना सुरू आहेत.पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश असतानाही स्थानिक पातळीवर चुकीचे निकष लावून अन्याय केल्याच्या घटना तालुक्यात वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे दारिद्रयरेषेखालील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.अन्यायाविरोधात कार्यकारी अधिकाºयांकडून चौकशी करून घरकूल मिळवून द्यावे. अन्यथा पुन्हा आंदोलन करू, असा इशारा भगिरथ झाडे यांनी निवेदनातून केला आहे.सदर प्रकार चुकून झाला असून शहानिशा करण्यात आली नव्हती. यापुढील यादीत घरकुल देण्यात येईल.- ममता बक्षीग्रामसेविका, घाटकुळघरकुल अन्यायग्रस्तांनी तक्रार केल्यास तातडीने चौकशी करून न्याय देण्यात देवू.- विनोद देशमुखउपसभापती, पं.स. पोंभूर्णासदर प्रकरण कार्यकारी अधिकाºयांकडे पाठविण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.-शशिकांत शिंदेसंवर्ग विकास अधिकारी, पं.स. पोंभूर्णा