शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचे स्वप्न साकार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:04 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.

ठळक मुद्दे१९ जणांना वाटप : जमीनधारकांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन विभागाची जमीन उपलब्ध झाली असून खासगी जमीनधारकांना रक्कम वाटप करण्याची प्रक्रिया सुरु झाली व १९ लोकांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे.चंद्रपूर जिल्हा औद्योगिक क्षेत्रात मोडत असून येथे कोळसा] सिमेंट, पेपरमिलचे कारखाने आहे. तसेच येथील बिटी वुड म्हणून सागवान लाकूड भरतात प्रसिद्ध आहे. या सर्व कारखानदाराचे मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, मद्रास, कलकत्ता, अहमदाबाद या परिसरात प्रमुख वरीष्ठ स्तरावरील कार्यालय आहे. त्यामुळे त्यांना कामे करण्यासाठी विमानाने जाणे-येणे करणे सोईस्कर होते. बºयाच कारखानदारांना या जिल्ह्यातील उपलब्ध कच्चा माल हवा आहे.मात्र विमानतळाअभावी ते पाठ दाखवित होते. याची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेवून विमानतळाची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी जमिनीची शोध मोहीम सुरु केली व यात राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील जमीन उपलब्ध करुन विमानतळ प्राधिकरणाच्या सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या. आता जमीनधारकांना प्रति एकर आठ लाख रुपयाप्रमाणे १९ पट्टे धारकांना मोबदल्याची रक्कम देण्यात आली आहे. एकूण ६३ पट्टेधारक असून दररोज पाच पट्टेधारकांना रजिस्ट्री करुन रक्कम अदा केली जात आहे.या विमानतळासाठी एकूण ७२० एकर जमीन विमान तळ प्राधिकरणास देण्याचे ठरले आहे. यात खाजगी जमीन २८७ एकर, वन जमीन व्१८५ एकर व सरकारी जमीन २४७ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.शासकीय जमिनीच्या हस्तांतरणाकरिता भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूरकडे प्रस्ताव सादर केला आहे. तसेच वन जमिनीचे प्रस्ताव वन प्रबोधीनी चंद्रपूरमार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहे. अतिक्रमणधारकांना मोबदलाबाबत भूसंपादन अधिकारी राजुरा यांनी विमानतळ प्राधिकरणास यावर निर्णय घेण्यासाठी कळविले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आम जनता, कारखाने धारक, शासकीय कर्मचारी, राजकीय नेते तसेच गडचिरोली व आदिलाबाद, आसिफाबाद व मंचेरियाल (तेलंगणा) या जिल्ह्यातील लोकांना विमानतळाचा लाभ घेता येणार आहे. मूर्ती हे गाव मध्यभागी असल्यामुळे प्रवास करणे सोयीचे होणार आहे. एका वर्षाच्या आत विमानतळ सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.