शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

हवाई सफरीचे स्वप्न झाले साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 00:35 IST

लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेत दरवर्षी होत असते. त्यामध्ये गडचांदूरच्या महात्मा गांधी विद्यालयाची श्रृती येवले सहभागी झाली.

लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : गडचांदूरच्या श्रृतीने घेतला आनंदलोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : लोकमत संस्काराचे मोती या स्पर्धेत दरवर्षी होत असते. त्यामध्ये गडचांदूरच्या महात्मा गांधी विद्यालयाची श्रृती येवले सहभागी झाली. त्यात ती विजेती झाली. हवाई सफरीची संधी मला मिळेल, याची खात्री नव्हती. परंतु माझी निवड झाल्याचे कळले. तेव्हा मला मनस्वी आनंद झाला, असे श्रृतीने सांगितले.ती म्हणाली, स्पर्धेतील विजेते विद्यार्थी २१ जून रोजी पहाटे ६ वाजता लोकमत भवन, नागपूर येथून विमानतळाकडे निघाले. ७.३० वाजता विमानात प्रवेश केला तेव्हा खूप आनंद झाला. दिल्ली येथे ९.३० वाजता पोहोचल्यानंतर तेथील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी निघालो. फिरण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वे संग्रहालय पाहून बरेच शिकायला मिळाले. गांधी स्मृती भवन, इंदिरा गांधी स्मृती भवन, इंडिया गेट या ठिकाणी भेट दिली.राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांनी आमचे कौतुक केले. उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी आमच्याशी संवाद साधला. भविष्यात तुमचे स्वप्न काय आहे, असे विचारले. हवाई सफरीमध्ये ‘लोकमत’ने आम्हा सर्व ३५ विद्यार्थ्यांची काळजी घेतली. नाश्ता, जेवन, चहाची व्यवस्था वेळेवर केली. परत रात्री ९.३० वाजता नागपूर विमानतळावर पोहचलो. एकंदरीत हवाई सफर स्मरणीय ठरली आहे.संस्काराचे मोती स्पर्धा लोकमतने सुरू करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली आहे. खुप शिकण्यास मिळाले. ‘लोकमत’चा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे, असे श्रृतीने सांगितले.श्रृती येवले हिचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, सचिव प्रा.डॉ. अनिल चिताडे, सहसचिव धनंजय गोरे, जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे, मुख्याध्यापक गिरीधर बोबडे, उपमुख्याध्यापक रमेश पाटील, उपप्राचार्य शरद जोगी, पर्यवेक्षक विलास बोढे, कृष्णा बत्तुलवार, प्रशांत उपलेंचवार तथा शिक्षकांनी कौतुक केले.या सफरीसाठी आईबाबांनीसुद्धा संमती दिली. लहानपणापासून विमानात बसण्याचे स्वप्न बघत होती. ‘लोकमत’मुळेच हवाई सफरीचे स्वप्न साकार झाल्याचे श्रृती केशवराव येवले हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.