शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ओपनकास्टसाठी नाला वळविल्याने धान पीक पाण्याखाली !

By admin | Updated: July 17, 2016 00:37 IST

जिल्ह्यातील वरोरा परिसरात असणाऱ्या नागलोन ओपनकॉस्टचे बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते.

शेतकऱ्यांचे नुकसान : मदत द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्याचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा परिसरात असणाऱ्या नागलोन ओपनकॉस्टचे बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार, खासदारांना निवेदन दिले. मात्र कोणत्याही प्रतिनीधीने त्यांची समस्या सोडविली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी मधुकर डाहुले या शेतकऱ्याने केली आहे.नागलोन ओपनकॉस्ट परिसरात अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. त्याच्या पूर्वेला शिरणा नदी आहे. पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाणारा कोराडी नाला आहे. मात्र सप्टेंबरपासून नागलोन ओपनकॉस्ट केल्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाने कोराडी नाल्याची दिशा बदलवून तो पश्चिमेकडून पूर्वेला शिरणा नदीकडे वळविला आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर दोन्ही नाल्याचे बॅक वॉटर परिसरातील शेतात जाते. संततधार पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली आली. त्यामध्ये पळसगाव परिसरातील २० शेतकऱ्यांची पिके संपूर्णत: पाण्याखाली येऊन सडली. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वेक्षण करुन मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)सर्वेक्षण करण्याची मागणी मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याभरात सतत पाच दिवस संततधार पाऊस पडला. त्यामुळे नागलोन नाल्याच्या बॅक वॉटरचे पाणी परिसरातील शेतात गेले. शेतकऱ्यांनी ओरड करूनही अद्याप सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे सर्वेक्षण करुन मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगीपरिसरातील शेतकऱ्यांनी आपली समस्या सोडविण्यासाठी आमदार, खासदार, त्याचबरोबर जिल्हाधिकारी, तहसीलदार, वेकोलि व्यवस्थापक यांनासुद्धा निवेदन देण्यात आले आहे. मात्र कुणीही दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मदत द्या, नाहीतर आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी केली.