शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Dr Sheetal Amte Sucide News : धक्कादायक! आनंदवन येथे डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 14:48 IST

Chandrapur News Sheetal Amte आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.

चंद्रपूर : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे Dr Sheetal Amte  यांनी आत्महत्या Suicide केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्राने दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर आहेत. शीतल या ३९ वर्षांच्या होत्या. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.

हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.

आनंदवन येथील घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे व वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे पोलीस ताफ्यासह दाखल झाले असून त्यांच्या घराची तपासणी सुरू केली आहे. डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे वडील विकास आमटे, आई  भारती आमटे व भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी हेमलकसा येथे काही दिवसांपासून रहायला गेले होते. 

शीतल करजगी आमटे यांच्या वक्तव्यावर आमटे कुटुंबियांनी दिले होते निवेदन

लोकाश्रयावर विकसित झालेल्या महारोगी सेवा समिती वरोरा या संस्थेबद्दल आमटे कुटुंबातील शीतल गौतम करजगी-आमटे यांनी अनुचित वक्तव्य असल्याबाबत बोलताना, आमटे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी, एका निवेदनाद्वारे, समितीच्या कामाबद्दल कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये अशी भावना अलीकडेच व्यक्त केली होती. २५ नोव्हेंबर रोजी त्यांचे हे निवेदन लोकमतने प्रसिद्ध केले होते. डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी संयुक्तपणे काढलेल्या या निवेदनात, डॉ. शीतल करजगी यांनी संस्थेच्या कार्यात योगदान दिले आहे. परंतु त्या सध्या मानसिक  ताण आणि नैराश्येचा सामना करीत आहेत. समाजमाध्यमांवर अलीकडेच त्यांनी तशी स्पष्ट कबुलीही दिली होती. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असे आवाहन आमटे कुटुंबियांनी केले होते.आमच्या नैतिक भूमिकांशी, ध्येय उद्दिष्टांशी आजन्म प्रामाणिक राहू, आमच्या प्रत्येक प्रकल्पात नैतिक कायदेशीर मूल्ये आणि पारदर्शकता जपली जाईल असेही त्यांनी या निवेदनात म्हटले होते. 

 

टॅग्स :baba amteबाबा आमटेSuicideआत्महत्याPoliceपोलिसDr Sheetal Amteडॉ शीतल आमटे